खरीप हंगामातील पीकविम्याचे दोन कोटी पडून

खरीप हंगामातील पीकविम्याचे दोन कोटी पडून
खरीप हंगामातील पीकविम्याचे दोन कोटी पडून

सांगली ः सन २०१७ मधील खरीप हंगामातील पीकविम्याचे दोन कोटी रुपये पडून आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करा, असे आदेश देऊनही त्याचे वाटप झाले नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. मात्र, पाच ऑगस्ट रोजी ऑनलाइन यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ऑफलाइनच अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने वाढीव मुदत दिली. त्यानुसार एका शेतकऱ्याने अर्ज केला. यामध्ये शेतकरी पात्र देखील झाला. जिल्ह्याला पीकविम्याची २ कोटी इतकी रक्कम मिळाली आहे. 

जिल्ह्यात यंदा दुष्काळाची भीषण स्थिती आहे. गेल्या वर्षी खरिपाची पिके चांगली आली नाहीत. रब्बी हंगाम देखील वाया गेला. जनावर छावणीत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यंदा अवकाळी पाऊस झाला नाही. गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली. परंतु, आजपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना खरीप सन २०१७ मधील पीकविमा अद्यापही कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला नाही. पीकविमा देण्यास विलंब झाल्याने पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाचे कृषी विभागाने पालन केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कृषी विभागाच्या रटाळ कामामुळे शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहवे लागत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अजून यादी तयार नाही खरीप २०१७ मधील हा पीकविमा आहे. शासनाने शेतकऱ्यांची विम्याची रक्कम कृषी विभागाकडे वर्ग केली आहे. परंतु, कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी करण्यासाठी विलंब करीत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षे झाली, तरी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार नाही. यामुळे कृषी विभाग किती काम करण्यास तत्पर आहे, याची प्रचिती यावरून येते आहे.

शासनाकडून पीकविम्याची रक्कम आली आहे. पात्र, शेतकऱ्यांच्या याद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे.  - सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली कृषी अधीक्षक कार्यालय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com