महावितरणची अनधिकृत पथदिवे काढणी मोहीम

मराठवाड्यातील विविध शहरे तसेच ग्रामीण भागांत सुरू असलेले अनधिकृत पथदिवे काढण्याची धडक मोहीम सोमवार (ता. १७) पासून महावितरणतर्फे राबवली जाणार आहे.
महावितरणची अनधिकृत पथदिवे काढणी मोहीम
Unauthorized street lighting campaign of MSEDCL

परभणी : मराठवाड्यातील विविध शहरे तसेच ग्रामीण भागांत सुरू असलेले अनधिकृत पथदिवे काढण्याची धडक मोहीम सोमवार (ता. १७) पासून महावितरणतर्फे राबवली जाणार आहे. 

स्वतंत्रपणे बसवलेले पथदिवे स्वत:हून काढून घ्यावेत, नाही तर संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार वीजचोरीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून वीजबिल थकबाकी वसुलीसाठी मराठवाड्यात ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू आहे.

या मोहिमेत डॉ. गोंदावले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले आहेत. अनेक गावे व शहरांत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बसवण्यात आलेले पथदिवे अनधिकृतपणे सुरू असल्याचे या मोहिमेत निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्यातर्फे गावे व शहरात पथदिवे लावण्यात आलेले आहेत. सदर पथदिवे चालूबंद करण्यासाठी स्वतंत्र स्ट्रीटलाइट फेज (स्वतंत्र तार) लावण्यात येते. परंतु बहुतांश ठिकाणी सदर स्वतंत्र फेजची उपलब्धता न करता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे पथदिवे परस्पर लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. 

या पथदिवे स्वतंत्र फेजला न जोडल्यामुळे २४ तास सुरू असतात. त्यामुळे विजेसारख्या राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय होतो. सोबतच महावितरणचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणतर्फे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या आठही जिल्ह्यांत ग्रामीण भाग व शहरांमध्ये असे अनधिकृत पथदिवे काढण्याची मोहीम सोमवारी सुरू करण्यात येणार आहे. या बाबत सर्व संबंधित संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सूचित करण्यात आले आहे. 

या बरोबरच सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी आपली चालू वीजबिले व थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहक नियमित व वेळेत वीजबिल भरत आहेत का याची ‘हर घर दस्तक’ मोहिमेत महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. तसेच  ग्राहकांना वीजबिलाबाबत असलेल्या शंकांचे तत्काळ निरसन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बिल दुरुस्त करून त्यांना जागेवरच ऑनलाइन भरण्यास कर्मचारी प्रोत्साहित करत आहेत. ग्राहकांना अडचण आल्यास बिलाची रक्कम स्वीकारून अॅपद्वारे वीजबिल भरून घेतले जात आहे. तसेच बिल भरल्याचा एसएमएस तत्काळ पाठवला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.