राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत  ४ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके आणि पीक प्रात्यक्षिकासाठी अनुदान तत्त्वावर शासनाने शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत  ४ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी  Under the National Food Security Mission 4,000 farmers registered
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत  ४ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी  Under the National Food Security Mission 4,000 farmers registered

सांगली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके आणि पीक प्रात्यक्षिकासाठी अनुदान तत्त्वावर शासनाने शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील ४ हजार १२० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी जत तालुक्यातून झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेत यंदाच्या खरीप हंगामात प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी किटसाठीही महाडीबीडी प्रणालीद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. कडधान्य, भरडधान्ये, तृणधान्याचे बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जाणार आहेत.  कडधान्य बियाणे ५० व २५ रुपये प्रति किलो, संकरित मका, बाजरी १०० रुपये प्रति किलो, ज्वारी व बाजरी ३० व १५ रुपये प्रति किलो, सोयाबीन १० रुपये प्रति किलो या दराने बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकूण किमतीच्या ५० टक्के अनुदान आहे. एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत याचा लाभ मिळणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका करासाठी खतही मिळणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षक औषधे यासाठी प्रति एकरी एका पिकासाठी २ ते ४ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील केले आहेत. सर्वाधिक नोंदणी जत तालुक्यातून केली आहे. ४ हजार १२० नोंदणी पैकी अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिकासाठी जिल्ह्यातून २ हजार ३७४ नोंदणी केली आहे. 

तालुकानिहाय ऑनलाइन बियाण्यांसाठी  अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 

 • तालुका....शेतकरी संख्या 
 • आटपाडी...२२३ 
 • जत...१२६१ 
 • कडेगाव...३५३ 
 • कवठेमहांकाळ...३५३ 
 • विटा...८७ 
 • मिरज...४२६ 
 • पलूस....१०९ 
 • शिराळा....५० 
 • वाळवा...३९८ 
 • तासगाव....५८४ 
 • एकूण....४१२०   
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com