नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार हेक्टरला फटका

नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बिलोली तालुक्यातील एक हजार ९२३ हेक्टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या बाबत कृषी आणि महसूलकडून जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार हेक्टरला फटका
Untimely in Nanded district Hit two thousand hectares

नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बिलोली तालुक्यातील एक हजार ९२३ हेक्टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या बाबत कृषी आणि महसूलकडून जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. 

जिल्ह्यात मंगळवारनंतर बुधवारी (ता. ३०) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. हा पाऊस नांदेड, किनवट, अर्धापूर, बिलोली तालुक्यांतील काही मंडळांत झाला. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण होते. यामुळे थंडी गायब झाली होती.

मंगळवारी किनवट व माहूर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. यानंतर बुधवारी शिवणी मंडळात १२.३०, नांदेड शहर ८.३०, आदमपूर ८.३०, तरोडा २.८०, बिलोली २, नांदेड ग्रामीण १.८०, सगरोळी १.३०, मालेगाव १.३० व दाभड १ मिलिमीटर पाऊस होता. या पावसामुळे बिलोली तालुक्यातील चार हजार १६ हेक्टरपैकी एक हजार ९२३ हेक्टरवरील हरभरा, गहू, रब्बी ज्वारी आदी रब्बी पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने व्यक्त केला आहे. तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

गावनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

रामपूर थडी १६०, खतगाव २४०, मुतन्याळ १५०, मिनकी २७०, आदमपूर १२०, हिप्परगा थडी १४०, केसराळी ३७०, जलालपूर १६०, शिंपाळा १६३, दोलतापूर १५० हेक्टर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.