उष्ण लाटेने होरपळले अमेरिका, कॅनडा

अमेरिका आणि कॅनडा देशांत विशेषत: पश्‍चिम भागात सध्या उष्णतेच्या ऐतिहासिक लाटेने हाहाकार माजविला आहे. केवळ पाच दिवसांत या दोन्ही देशांत मिळून ५००च्या वर बळी गेल्याने याचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
US, Canada swept by heat wave
US, Canada swept by heat wave

वॉशिंग्टन : अमेरिका आणि कॅनडा देशांत विशेषत: पश्‍चिम भागात सध्या उष्णतेच्या ऐतिहासिक लाटेने हाहाकार माजविला आहे. केवळ पाच दिवसांत या दोन्ही देशांत मिळून ५००च्या वर बळी गेल्याने याचे गांभीर्य आणखी वाढले आहे. कडाक्याच्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असून, अनेक भागांत पर्यावरणीय प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. 

कॅनडाच्या विशेषत: ब्रिटिश कोलंबिया आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन, ओरेगॉन पश्‍चिमेकडील राज्यांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक आहे. ३८ ते ४७ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान असल्याने नागरी जीवनमान अस्वस्थ झाले आहे. गेल्या सात दिवसांत ब्रिटिश कोलंबियात तुलनेने सर्वाधिक मृत्यू झाले असून, हा आकडा ५००च्या वर गेला आहे. 

‘उष्णतेच्या डोम’ने केली कोंडी धक्कादायक म्हणजे या उष्णतेच्या लाटेने या भागावर ‘उष्ण डोम’ (घुमट) तयार केला असून, इतर हवामानस्तरीय हालचालींना प्रतिबंध करून एकप्रकारे कोंडीचे केल्याचे दृश्‍य सध्या पाहावयास मिळत आहे. प्रचंड उच्च दाब हवामान स्थितीची ला-निनासह इतर प्रभावी घटकांमुळे निर्मिती झाल्यानंतर डोम तयार होतात. 

उत्तर भारतातही उष्ण तापमान उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पश्‍चिमी उत्तर प्रदेश, उत्तर पश्‍चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशातील तापमानात सध्या कमालीची वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशातील उणा येथे सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातही ३१ ते ४२ अंशांदरम्यान सध्या तापमान असून, नागरी जीवन यामुळे प्रभावित झाले आहे.

जपानमध्ये पूरस्थिती... अमेरिका, कॅनडाच्या पश्‍चिम बाजूस असलेल्या जपानमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जपानच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आले असून, काही भागांत भूस्खलन झाल्याने मालमत्तेच्या नुकसानीसह अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. अमेरिका आणि कॅनडातील उष्णलाटेचा अथवा हवामान बदलाचा परिणाम म्हणून या पावसाकडे पाहिले जात आहे. 

उष्णतेच्या लाटेचे परिणाम

  • नागरीसह पशू, पक्षी जीवनमान प्रभावित
  • हिमनग लागले वितळू, काही भागात पूर
  • ब्रिटिश कोलंबियातील काही जंगलांना आग
  • उष्ण तापमानामुळे मालमत्तेचेही नुकसान 
  • पृथ्वीवरील आतापर्यंत पाहिलेली ही सर्वांत उष्ण अशी लाट आहे. हवामानात कितीही बदल झाले, तरी या भागात आतापर्यंत एक अंश सेल्सिअसपेक्षा जास्त फरक तापमानात झालेला नाही. या प्रकारात मात्र त्या नोंदी नष्ट झाल्या आहेत. हवामान बदलामुळे या उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढल्याची शक्यता आहे.  - डॅनिअल स्वॅन, हवामान तज्ज्ञ  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com