मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७० टक्‍क्‍यांवर

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ७० टक्‍क्‍यांवर आला आहे.
Useful Water in Marathwada storage at 70%
Useful Water in Marathwada storage at 70%

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ७० टक्‍क्‍यांवर आला आहे. ४७ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली, तर ८ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. 

जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे गेल्या पावसाळ्यात तुडूंब झालेले प्रकल्प आता हळूहळू रिते होण्याला प्रारंभ झाला आहे. जलसंपदा विभागाच्या १२ फेब्रुवारी अखेरच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत सद्यःस्थितीत ७९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तुडूंब झालेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ८० टक्‍क्‍यांवर आहे.

येलदरीत ८४ टक्‍के, सिद्‌धेश्‌वर ५४ टक्‍के, माजलगाव ७५ टक्‍के, मांजरा ७९ टक्‍के, ऊर्ध्व पैनगंगा ८० टक्‍के, निम्न मनार ६४ टक्‍के, निम्न तेरणा ८१ टक्‍के, विष्णुपुरी ६३ टक्‍के, निम्न दुधना ८४ टक्‍के, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात ८९ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे.  मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी लातूर जिल्ह्यातील ८ प्रकल्पांत सर्वात कमी ४२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ४१ टक्‍के उपयुक्त पाणी

१२ फेब्रुवारी २०२० अखेर मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत ४३ टक्‍के, तर याच तारखेअखेर २०१९ ला केवळ ७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.  ७५२ लघु प्रकल्पांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ प्रकल्पांत ४१ टक्‍के, हिंगोलीतील २६ प्रकल्पांत ४१ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पांत ४८ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ४८ टक्‍के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ४८ टक्‍के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ५३ टक्‍के तर औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ५० टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com