जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्‍क्‍यांवर

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठाही ९८.४६ टक्‍क्‍यावर पोचल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
Useful water storage in Jayakwadi at 71.39 percent
Useful water storage in Jayakwadi at 71.39 percent

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठाही ९८.४६ टक्‍क्‍यावर पोचल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (ता.१८) सकाळी जायकवाडीत ६३६९ क्‍युसेक्‍सने पाण्याची आवक सुरू होती. ती आवक २० सप्टेंबरला सकाळपर्यंत ३४९० क्यूसेक्सपर्यंत खाली आली होती. जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या भागातील प्रकल्पांमधून होणाऱ्या विसर्गामुळे गत काही दिवासांपासून जायकवाडीत पाण्याची आवक सातत्याने वाढली. ती आता काही प्रमाणात कमी झाली आहे. १६ सप्टेंबरला सकाळी ४५९७९ क्‍युसेक्‍सने पाण्याची आवक सुरू होती. तर जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ६८.३८ टक्‍क्‍यांवर होता. 

शनिवारी सकाळी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २२७२.१८३ दलघमी, तर उपयुक्‍त पाणीसाठा १५३४.०७७ दलघमी झाला होता. गतवर्षी १८ सप्टेंबरला जायकवाडीत आजच्या तुलनेत २१५८.९९४ दलघमी अर्थात ९९.४४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला होता. २० सप्टेंबरला सकाळापर्यंतच्या माहितीनुसार १०२ टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ५४.७२७९ टीएमसीवर पोचला आहे. प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ८०.७९०९ टीएमसी झाला, अशी माहिती प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ९८.४६ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. प्रकल्पात दुपारी १२ वाजताच्या सुमारास १९९७ क्‍युसेक्‍सने आवक व तितकाच विसर्ग प्रकल्पातून सुरू होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com