हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा अमावास्या साजरी

सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील राज्याच्या अनेक भागांत दर्श अमावास्या तथा वेळा अमावास्या रविवारी (ता.२) मोठ्या उत्साहात साजरी केली.
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा अमावास्या साजरी
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा अमावास्या साजरी

नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील राज्याच्या अनेक भागांत दर्श अमावास्या तथा वेळा अमावास्या रविवारी (ता.२) मोठ्या उत्साहात साजरी केली. ‘हुलगे हुलगे- पावन पुलगे’च्या गजरामध्ये हा सण साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात कृषी संस्कृतीचे दर्शन घडून आले. अमावास्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र), अशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतात. पण मराठवाड्यातील विशेषतः लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांत वेळ अमावास्येचा सण आनंदाने साजरा करतात. येळ-अमोश्या, एलामास, असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द. अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरा होणारा सन. मुळातील शब्द हा ‘येळी अमावास्या’ असून, त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावास्या’ असे झाले.  कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या म्हणजे ही येळी अमावास्या असते. ‘हुलगे हुलगे-पावन पुलगे’ ‘होलग्या होलग्या-सालन पलग्या’ ‘हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला’ ‘चांगो चांगभलं, पाऊस आला घरला चला,’ या उच्चाराने शिवार दुमदुमून गेले होते.  दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयऱ्यांना, मित्रांना अन् अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात. शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी, अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटुंबीय लक्ष्मीआई पुढे करीत असतात. सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणे लागतो, या पवित्र भावनेने दर्श अमावास्या ही ‘वेळ अमवस्या’ म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पिकांची देखील पूजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पूजा मनोभावे केली जाते. सुगड्यामध्ये आंबिल ठेवली जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.