नाशिक : शेतमाल व्यापाऱ्यांची होणार पडताळणी 

verification of traders
verification of traders

नाशिक: जिल्ह्यात द्राक्ष, टोमॅटो तसेच कांदा उत्पादकांच्या सातत्याने आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसतो. रुपयांचे नुकसान होत असते. त्यामुळे असे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस व्यापाऱ्यांची पडताळणी करणार आहेत. गावात नवीन व्यापारी शेतमालाच्या खरेदीसाठी आल्यास त्याची माहिती देण्याची जबाबदारी पोलीस पाटील तसेच संबंधित भागातील बाजार समितीकडे देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. 

शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस काही दिवसांत नवीन प्रकारचे फॉर्म तयार करणार असून, जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्याने संबंधित पोलीस ठाण्यातून हा फॉर्म घेऊन भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा फॉर्म भरणाऱ्या व्यापाऱ्याची वैयक्तिक, व्यावसायिक तसेच इतर महत्त्वाची चौकशी करणार आहे. व्यापाऱ्याच्या आधार कार्डसह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती पोलीस ठाण्यात ठेवण्यात येतील. भविष्यात अशा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास यामुळे कमीत कमी वेळेत तपास करणे शक्य होणार असल्याचे सिंह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

शेतमाल विक्री फसवणुकीच्या प्रकरणात पैसे हस्तगत होणे महत्त्वाचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल उधारीवर विक्री करण्याबाबत सजगता दाखवणे आवश्यक आहे. व्यापाऱ्याशी व्यवहार करण्यापूर्वी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यांकडून त्याबाबत माहिती घ्यावी, व्यापाऱ्याची पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाची नोंद असल्याची खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्या म्हणाल्या. 

पोलीस पाटलांमार्फत होणार कामकाज  गावात कोणी नवीन व्यापारी आला तर याबाबतची माहिती लगेच गावातील पोलीस पाटील पोलिसांना देतील. तसेच त्या भागातील बाजार समित्यांकडे आलेल्या व्यापाऱ्यांची माहितीही समित्या त्या भागातील पोलीस ठाण्यांना देणार आहेत. पोलीस पाटील तसेच बाजार समितीला हा नियम बंधनकारक असल्याचे सिंह म्हणाल्या. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com