पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या  हस्तांतरणासाठी समिती 

राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या हस्तांतरणाबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी घेतला आहे.
 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या  हस्तांतरणासाठी समिती 
veterinary medicine transfer committee

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या हस्तांतरणाबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी घेतला आहे. मंत्रालयात या बाबत नुकतीच बैठक झाली असून, या समितीने सर्वंकष अभ्यास करून अहवाल महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.  राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखाने राज्य सरकारकडे आणि जिल्हा परिषदांकडील श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखाने जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्याचे सरकारच्या विचारााधीन आहे. मात्र, या हस्तांतरणाचा वैद्यकीय सेवेवर काय परिणाम होईल, किंवा प्रभावी वैद्यकीय सेवा मिळू शकेल का? या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली ही समिती जिल्हा परिषद आणि राज्य सरकारचे नियंत्रण असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा तुलनात्मक अभ्यास करून भविष्यात प्रभावी सेवा देण्यासाठी कोणती कार्यप्रणाली अवलंबावी, पशुपालकांना तत्काळ सेवा कशा देता येतील या बाबत सविस्तर प्रस्ताव सरकारला सादर करणार आहे. 

समितीतील सदस्य  अतिरिक्त आयुक्ता डॉ. परकाळे यांच्यासह पुणे विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. पंचपोर, डॉ. भि. डो. राजपूत, कोल्हापूरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, पुणे येथील उपायुक्त डॉ. देवेंद्र जाधव, लातूरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, प्रशासनाधिकारी महावीर पाटील आदी सदस्यांचा समावेश आहे. ही समिती एक महिन्यांच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.