पंढरपुरातील पूररेषेतील गावांनी दक्षता बाळगावी : बेल्हेकर

सोलापूर ः ‘‘भीमा नदी काठच्या पूररेषेतील गावांनीही दक्षता घ्यावी’’, अशा सूचना पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिल्या.
Villages in flood line in Pandharpur should be vigilant: Belhekar
Villages in flood line in Pandharpur should be vigilant: Belhekar

सोलापूर ः ‘‘गेल्या वर्षी अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांसह शेती पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तसेच जीवित व पशुहानी टाळण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भीमा नदी काठच्या पूररेषेतील गावांनीही दक्षता घ्यावी’’, अशा सूचना पंढरपूरचे तहसीलदार सुशील  बेल्हेकर यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, सहाय्यक उपनिबंधक एस. एम. तांदळे, उपमुख्याधिकारी  सुनील वाळुजकर, भीमा पाटबंधारे विभागाचे एस. एन. चौगुले आदी उपस्थित होते.

बेल्हेकर म्हणाले,‘‘पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोचणार नाही. जीवित व वित्तहानी होणार नाही, या साठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत योग्य नियोजन करण्यात आले आहे. महापुरामुळे नदी काठावरील गावांमधील ज्या लोकांची घरे पुरामुळे बाधित झाली. त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तालुका प्रशासनाकडून संबंधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात येईल.’’

  ‘भीमा नदीतील अतिक्रमणे काढा’

‘‘उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत संबंधित विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे.  नागरिकांनी नदी पात्रातील अतिक्रमणे तातडीने काढावीत. सुरक्षित ठिकाणी जावे. नदी, नाले, ओढे या वरील पुलांची व संरक्षण कठड्यांची  पाहणी बांधकाम विभागाने करावी. पावसाळ्यात साथीचे रोग अधिक उध्दभवण्याची शक्यता असते. यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा सुरळीत ठेवावा’’, अशा सूचना बेल्हेकर यांनी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com