विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर बंद

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर बंद
विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर बंद

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचे संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी मान्य केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यात सोलापूरसह राज्यात महत्त्वाच्या समजले जाणारे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर व सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मंदिराचाही समावेश आहे.  कोरोना विषाणूंच्या संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील देवस्थानच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्या वेळी सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे आणि देवस्थान प्रमुखांनी दर्शन ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे मान्य केले. धार्मिक स्थळातील विधी आणि नित्योपचार सुरू राहतील. पण हे करतानाही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी धार्मिक स्थळांच्या प्रमुखांना केले. या वेळी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती पंढरपूर, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट, मारुती मंदिर गौडगाव, दर्गाह, हैद्रा, सिद्धेश्‍वर मंदिर देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.  लोकांनी गर्दी करू नये. लग्न, कौटुंबिक समारंभात गर्दी करू नये. शक्‍य असल्यास लग्न समारंभ लांबणीवर टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले. बाजार समितीतील व्यवहार तीन सत्रांत करण्याच्या सूचनाही बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com