मंडणगडात गिधाडे अन्नाच्या शोधात

सुमारे ६५ गिधाडे दोन दिवस मंडणगड तालुक्यातील बोरखत कातळावर आठ वर्षांनी अवतरली आहेत. बोरखत कातळ परिसरात मृत जनावर खाण्यासाठी ही गिधाडे आली असल्याचे ग्रामस्थ जितेंद्र दवंडे यांनी सांगितले.
Vultures in search of food in Mandangad
Vultures in search of food in Mandangad

मंडणगड, जि. रत्नागिरी ः पर्यावरणाच्या जैव साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून गिधाड प्राण्याची ओळख आहे. निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणूनही त्यांना संबोधले जाते. सुमारे ६५ गिधाडे दोन दिवस मंडणगड तालुक्यातील बोरखत कातळावर आठ वर्षांनी अवतरली आहेत. बोरखत कातळ परिसरात मृत जनावर खाण्यासाठी ही गिधाडे आली असल्याचे ग्रामस्थ जितेंद्र दवंडे यांनी सांगितले. याठिकाणी संवर्धन मोहीम राबवणे योग्य ठरणार असून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने येथे पाहणी केली होती.

जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. ही प्रत्येक जात महत्त्वाची आणि गरजेची आहे. हे पक्षी आळशी, कुरूप आणि बीभत्स जरी वाटत असले तरी निसर्गात त्यांचे महत्त्व आहे. गिधाड मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात. यांना निसर्गातील सफाई कर्मचारी म्हटले जाते. २१ जुलै रोजी बोरखत गावातील एक मृत बैल गावाबाहेरील कातळावर सुरक्षित जागी ठेवण्यात आला होता. त्यानंतर ही गिधाडे तिथे उतरली.

दुसऱ्या दिवशी हा आकडा सुमारे ६० ते ६५ च्या दरम्यान पोहोचला. दुर्मीळ गिधाडे पुन्हा अवतरल्याने व त्याची संख्या अधिकच वाढल्याने ग्रामस्थ आश्‍चर्यचकित झाले होते. गिधाडांना वाचवण्यासाठी सर्वच घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. औषधी, विषारी रसायनांमुळे गिधाडांचा मृत्यू वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com