`टेंभू'च्या पाण्याची ९७ हजार हेक्टर क्षेत्राला प्रतीक्षा

`टेंभू'च्या पाण्याची ९७ हजार हेक्टर क्षेत्राला प्रतीक्षा
`टेंभू'च्या पाण्याची ९७ हजार हेक्टर क्षेत्राला प्रतीक्षा

सांगली : सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील २४० गावातील १ लाख ११ हजार ८५६ हेक्टरला पाणी देण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली. गेल्या एकवीस वर्षांत १ लाख ११ हजार हेक्टर ८५६ हेक्टरपैकी १७ हजार ०३७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. याचा अर्थ या योजनेतील ९७ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या क्षेत्राला कधी पाणी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.    सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झाला नाही. पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. योजना सुरू केली, तरी १७ हजार हेक्टरलाच याचा फायदा होतो. त्यामुळे उर्वरित क्षेत्राला पाणीच मिळत नाही. त्यामुळे डाळिंब, द्राक्ष शेतीसह इतर पिके धोक्यात आली आहेत. जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. केवळ आवर्तन सोडून पाणीपट्टी वसूल न करता शेतकऱ्यांना पाणी कसे देता येईल, याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष घालावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

टेंभू सिंचन योजनेचे पाणी सात तालुक्यांत पोचले आहे. मात्र, मुख्य कालवा आणि दोन टप्पे यांचे काम पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून २१५ कोटींचे अर्थसाह्य करून मदतीचा हात दिला आहे. यामुळे योजनेचे काम जोमाने सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत या योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणीदेखील घेतली. आता पुढील टप्पा कधी पूर्ण होणार आहे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

 टेंभू उपसा योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी  मिळत आहे. शासनाने या योजनेच्या लाभ क्षेत्राला गेल्या वर्षी पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे देण्याचे जाहीर केले. याचे सर्व्हेक्षण झाले. काही ठिकाणी कामेही सुरू झाली. परंतु,  मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी लाभक्षेत्राला मिळणार नसल्याची स्थिती आहे.  

टेंभू योजनेचे लाभ क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका  गावे लाभ क्षेत्र
कऱ्हाड ३  ८३४
कडेगाव ३९ १२ हजार ९६२
तासगाव   ३५ ११ हजार ८१५
खानापूर  ५५ २५ हजार २६३
आटपाडी  ४७  २२ हजार२४०
कवठे महांकाळ ३९  १० हजार ९४२
सांगोला ३१ २७ हजार ८००
एकूण गावे  २४०  १ लाख ११ हजार ८५६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com