कलिंगडाचे दर सुधारण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

काढणीसाठी व्यापारीच मजूर आणत आहेत. जामनेरात विषाणूजन्य रोगामुळे कलिंगडात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. एकरी २०० क्विंटल उत्पादन साध्य होत अाहे. - विजय पाटील, शेतकरी (पळासखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव)
कलिंगडाचे दर सुधारण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
कलिंगडाचे दर सुधारण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

जळगाव : खानदेशात कलिंगडाचे दर प्रतिकिलो ५ ते ८ रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळत आहेत. दर परवडत नसल्याने नफा व खर्च यासंबंधीचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र २० रुपये प्रतिकिलोचे दर कलिंगडाला असल्याचे चित्र आहे. 

कलिंगडाची लागवड खानदेशात धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नवापूर, जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात झाली आहे. लागवड सुमारे सहा हजार हेक्‍टरवर झाली होती. सध्या काढणी सर्वत्र सुरू आहे. काढणीवर आलेल्या पिकात पहिले दोन दिवस दर्जेदार फळांची काढणी केली जाते. आकाराने बेढब व लहान फळांची दुय्यम दर्जाची फळे म्हणून दोन-तीन दिवसांत काढणी केली जाते. 

दर्जेदार, चार ते साडेचार किलो वजन असलेल्या, अंडाकार फळाला चांगले दर मिळत अाहेत. कमाल आठ रुपये प्रतिकिलोचे दर थेट शेतात मिळत आहेत. आकाराने लहान व अडीच ते तीन किलोच्या फळाला प्रतिकिलो पाच ते साडेपाच रुपये, असे दर थेट शेतात शेतकऱ्यांना मिळत आहेत. काढणी एकाच वेळी सुरू झाल्याने बाजारातील आवक वाढली आहे. 

जामनेर, शहादा, रावेर, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी व इंदूर येथील व्यापारी कलिंगडाची खरेदी करीत आहेत. बाजार समितीमध्ये किरकोळ आवक होत आहे. थेट शेतात खरेदी करून पाठवणूक उत्तर भारतासह राजस्थान, छत्तीसगड, मुंबई भागात केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com