सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या प्रतीक्षेत

सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या प्रतीक्षेत
सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या प्रतीक्षेत

सांगली : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली असून, केवळ १३ हजार ६९१ हेक्टर म्हणजेच पाच टक्क्यांवर पेरणी झाली आहे. ही पेरणी शिराळा, मिरज, वाळवा तालुक्यातच झाली आहे. पाऊस नसल्याने दुष्काळी भागातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात पेरणी झालेली नाही. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ इतके आहे. आजअखेर १३ हजार ६९१ हेक्टरवर पेरा झाला आहे. मिरज तालुक्यात म्हैसाळचे पाणी असल्याने ४९३ हेक्टरवर पेरा झाला. वाळवा तालुक्यात ४९५ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आले आहे. शिराळा तालुक्यात प्रामुख्याने भात पिक घेतले जाते. या तालुक्यात धूळ वाफेवर पेरणी केली जाते. तालुक्यात भाताचे सरासरी क्षेत्र १३ हजार ५८१ हेक्टर असून १० हजार ४८६ हेक्टरवर भात पेरणी झाली आहे.

गेल्या आठड्यात तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे भाताच्या पिकांची वाढ जोमदार होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वाफसा आल्यानंतर पेरणीसाठी शेतकरी पुढे येतील. 

पेरणी पूर्व मशागत उरकली

दुष्काळी भागातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणी पूर्व मशागती केल्या आहेत. आता पावसाची प्रतीक्षा आहे. जत तालुक्यात बाजरी, मका, तृणधान्ये, तूर, उडीद, अशा पिकांची पेरणी झाली आहे. परंतू पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज आहे. पाऊस न झाल्यास पेरणी झालेली पिके वाया जाण्याची भिती आहे. त्यामुळे दुबार पेरणीची शक्यता आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र
मिरज  ३५ हजार ७९२ ४९३
जत ४४ हजार ७६९ १६४४
वाळवा  ३२ हजार १९१ ४९५
शिराळा २७ हजार ९७१  १०८०२
पलूस १२ हजार ५२५ १३०
कडेगाव  २४ हजार ४६५ १२६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com