नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पेरण्यांसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पेरण्यांसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पेरण्यांसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चार-पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. परंतु सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. चांगला पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी कापूस लागवड सुरू केली आहे. काही भागात मुगाची पेरणी सुरू आहे. परंतु बहुतांश भागात पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्याच आहेत. पेरण्यासाठी उशीर होत असल्याने उत्पादनातदेखील घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. 

गतवर्षी (२०१८) नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश भागांत मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाला. त्यामुळे जून अखेरपर्यंत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांच्या पेरण्या उरकत आल्या होत्या. गतवर्षी आॅगस्ट महिन्यात पाऊस उघडल्यामुळे जमीन खाकस झाली आहे.

यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा झाले. शुक्रवार (ता. २१) पासून या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. काही मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. परंतु सर्वदूर सारख्या प्रमाणात पेरणी योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या पेरण्या अजून खोळंबलेल्याच आहेत.

जोरदार पाऊस झालेल्या भागातील शेतकरी जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर शेतकरी पेरणी करत आहेत. पुरेशा ओलाव्याअभावी जमिनीत खोलवर ओलावा उपलब्ध नसल्याने अजून खरखर आहे. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर,ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. 

बुधवारी हलका, मध्यम पाऊस

दरम्यान, बुधवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मंडलांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील उमरी, लोहा, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यांत पाऊस झाला.  परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील १४ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (कंसात मि.मी) 

नांदेड जिल्हा मनाठा (२०), पिंपरखेड (२), निवघा (८), तळणी (१४), हिमायतनगर (१९), सरसम (१६), जळवगाव (४), माहूर (४), उमरी (९), कापशी (७), चांडोळा (४५), येवती (२२), मालेगाव (३).
परभणी जिल्हा परभणी शहर (४), पिंगळी (१८), बनवस (७), लिमला (३), महातपुरी (३), सोनपेठ ((९), आवलगाव (११), बाभळगाव (८), सावंगी म्हाळसा (२६), मानवत (३). 
हिंगोली जिल्हा आखाडा बाळापूर (२), वाकोडी (३), वसमत (२), जवळा बाजार (६), साळणा (२).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com