‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारा

गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देता येणार नाही, असा ठराव प्रकल्पस्तरीय समितीने घेतला आहे. त्याच्या परिणामी शेतकऱ्यांवर सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
For the water of ‘Etiadoh’ Warning of indefinite fast
For the water of ‘Etiadoh’ Warning of indefinite fast

गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देता येणार नाही, असा ठराव प्रकल्पस्तरीय समितीने घेतला आहे. त्याच्या परिणामी शेतकऱ्यांवर सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. 

इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता भिवगडे यांना या संदर्भाने निवेदन देत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्‍त केला. निवेदनानुसार, इटियाडोह धरण अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. धरणातील पाण्याच्या माध्यमातून होणाऱ्या सिंचनामुळेच या भागात संपन्नता नांदते. दरवर्षी ७ हजार ५०० हेक्‍टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र प्रकल्पस्तरीय समितीने ठराव घेऊन २४ किलोमीटरपर्यंत पाणी देता येणार नाही, असे जाहीर केले.

शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवल्यास ईटियाडोह धरण कालव्यात बसून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

धरणाअंतर्गंत हंगाम २०१९-२० मध्ये रब्बी हंगामात पाणी देण्यात आले होते. गेल्यावर्षी प्रकल्पात ३४ फूट पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी ३०.८० फूट पाणीसाठा असताना गोठणगाव ते अर्जुनी मोरगाव या २४ किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांना वगळण्याचा निर्णय समितीने घेतला. ज्या तालुक्‍यात हे धरण आहे. त्याच तालुक्‍याला सिंचनापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान या माध्यमातून समितीने रचले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

परिसरातील तेराही पाणीवाटप संस्थांनी शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता हा ठराव घेतलाच कसा? यामुळे ७५०० हेक्‍टरपैकी केवळ २२०० हेक्‍टर शेतीलाच सिंचन होईल. उर्वरित शेती सिंचनाविना राहणार आहे. धरणातून पाणी निघते व कालव्याच्या अगदी सुरवातीच्या २४ किलोमीटरपर्यंत सिंचनाचे पाणी न देता २४ किलोमीटर पुढील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍नही संघटनेने उपस्थित केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com