नागपुरात ५९ गावांमधील पाणी दूषित

अनेक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जानेवारी महिन्यात तपासण्यात आलेल्या ९१२ पाण्याच्या नमून्यापैकी ५९ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे .
नागपुरात ५९ गावांमधील पाणी दूषित Water contaminated in 59 villages in Nagpur
नागपुरात ५९ गावांमधील पाणी दूषित Water contaminated in 59 villages in Nagpur

नागपूर : नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी अनेक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जानेवारी महिन्यात तपासण्यात आलेल्या ९१२ पाण्याच्या नमून्यापैकी ५९ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे . 

 प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येणाऱ्या पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. ही तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात.

मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे विविधप्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्या संदर्भातील निर्देश नुकत्याच पार पडलेल्या जि.प.च्या आरोग्य विभागाच्या बैठकीत उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती मनोहर कुंभारे यांनी संबंधितांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराने पुन्हा थैमान घातले आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अनेक आजार हे पाण्यापासून उद्भवत असतात. त्यामध्ये सर्दी, खोकला, पोटाचे विकार आदींचा समावेश आहे. कोरोनाचेही जवळपास हीच लक्षणे आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com