पुणे विभागात पाणीटंचाई होतेय तीव्र

लोणी भापकर परिसरात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पावसाअभावी ज्वारीचे पीक पूर्णपणे वाया गेले आहेत. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून दोन ते तीन दिवसांनी पाणी देण्यात येते. दूर अंतरावर असलेल्या भोसलेवस्ती, अमराळेवस्ती, भापकर वस्ती या भागात पाणी देण्यासाठी दोन टॅंकरची आवश्यकता आहे. - विजय बारवकर, सरपंच, लोणी भापकर, ता. बारामती, जि. पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील १३३ गावे, ९९५ वाड्यांमधील टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १३८ टॅंकर सुरू आहेत. विभागातील सुमारे २ लाख ७४ हजार लोकसंख्येची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी १३५ विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे विभागातील काही तालुक्यांमध्ये भर पावसाळ्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. यातच सप्टेंबर महिन्यात पावसाने माठी ओढ दिल्यानंतर पाणीटंंचाई वाढू लागली. पावसाअभावी खालावलेल्या भूजल पातळीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्राेत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक ९४ हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे ८३ हजार, पुणे जिल्ह्यातील ७९ हजार आणि सोलापुरातील सुमारे १८ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी टॅंकरची अहोरात्र धावाधाव सुरू आहे. माण तालुक्यातील सर्वाधिक ७३ हजार तर जतमधील ४४ हजार नागरिकांना टंचार्इची झळ बसत आहे. 

सातारा जिल्ह्यात टंचाईची तीव्रता सर्वाधिक असून, तब्बल ५२ गावे ३३२ वाड्यांना ५१ टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. यात माण तालुक्यातील सर्वाधिक ४१ गावे ३१२ वाड्यांतील ४१ टॅंकरचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील २४ गावे ३०५ वाड्यांमध्ये ४४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सांगलीतील ४६ गावे २७५ वाड्यांना ३५ टॅंकरने तर सोलापूरमधील ११ गावे ८३ वाड्यांना ८ टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अद्याप टॅंकर सुरू करावा लागला नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

जनावरांनाही पाणीटंचाईची झळ पिण्याच्या पाण्याचे स्राेत आटल्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यांत माणसांबरोबरच जनावरांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विभागातील २१ हजारांहून अधिक पशुधनाची तहान भागविण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागत आहेत. साताऱ्याच्या माण तालुक्यातील १६ हजार ७६९, खटाव तालुक्यातील ६२५, फलटण १ हजार ५७३ आणि सोलापुरातील माढा तालुक्यात २ हजार ४४४ पशुधनासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.     

विभागातील पाणीटंचाईची  जिल्हानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या  टॅंकर
पुणे २४ ३०५ ४४
सातारा ५२ ३३२ ५१
सांगली ४६ २७५ ३५
सोलापूर ११ ८३
एकूण १३३ ९९५  ३३८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com