धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत

पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे.
 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत Watershed of dams Rainy season in the area
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत Watershed of dams Rainy season in the area

पुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने भात पिकांच्या रोपांसाठी हा पाऊस पोषक असल्याची स्थिती आहे. महिन्यापासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत होत्या. त्यानंतर पाच जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विशेषतः हा पश्चिमेकडील असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधार सरी बरसत होत्या.  सध्या होत असलेल्या पावसामुळे भात खाचरामध्ये पाणीसाठा होत असल्याने भात रोपे तरारली आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे, वरसगाव दहा, मुळशी, पानशेत अकरा, टेमघर सहा, खडकवासला पाच, निरादेवधर तीन,  पवना, कळमोडी दोन, नाझरे, डिंभे एक मिलिमीटर पाऊस पडला. तर वीर, भाटघर, चिल्हेवाडी, पिपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चासकमान, कासारसाई या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला नसल्याची नोंदही जलसंपदा विभागाकडे झाली आहे.   धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  एक ते १४ जून या कालावधीत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) पिंपळगाव जोगे ७३, माणिकडोह ५३, येडगाव ४४, वडज ५१, डिभे ८४, घोड १२३, विसापूर ३८, कळमोडी ६७, चासकमान १३५, भामा आसखेड ६७, वडीवळे ११३, आंध्रा २११, पवना १४६, कासारसाई १२२, मुळशी ७४, टेमघर १०५, वरसगाव १२०, पानशेत ११७, खडकवासला ८५, गुंजवणी १०७, नीरा देवधर ७६, भाटघर ५९, वीर १०३, नाझरे ५०,उजनी ७३ आणि चिल्हेवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com