‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई कधी

जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा ध्यास घेऊन खासदार उन्मेष पाटलांनी गिरणा परिक्रमा सुरू केली आहे. जळगावातून सुरू झालेल्या या परिक्रमेचा आज (ता. १६) चौथा टप्पा भडगाव तालुक्यात पार पडला.
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई कधी
When will action be taken against those who stripped the ‘mill’?

चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा ध्यास घेऊन खासदार उन्मेष पाटलांनी गिरणा परिक्रमा सुरू केली आहे. जळगावातून सुरू झालेल्या या परिक्रमेचा आज (ता. १६) चौथा टप्पा भडगाव तालुक्यात पार पडला. या यात्रेच्या निमित्ताने खासदार उन्मेष पाटील पायी चालत ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या पदयात्रेला एकीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे गिरणामाईची ही दयनीय अवस्था करणाऱ्या वाळूमाफियांवर ठोस कारवाई व्हावी, अशी देखील संतप्त भावना गावागावांतील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

गिरणा नदी बाराही महिने पूर्वीसारखी वाहिली पाहिजे, या प्रमुख उद्देशाने खासदार उन्मेष पाटील यांनी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हाती तिरंगा घेत, गिरणा परिक्रमा सुरू केली. गिरणा नदीकाठी असलेल्या कण्वऋषींच्या आश्रमापासून १ जानेवारीला परिक्रमेची सुरुवात झाली. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या पदयात्रेमुळे विशेषतः गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये गिरणा नदीबद्दल जनजागृती होत आहे. या यात्रेचा चौथा टप्पा रविवारी भडगाव तालुक्यात पार पडला. या पदयात्रेतून खासदार पाटील हे आपल्या नदी संवर्धन करण्याचे आवाहन करीत आहेत.

वाळू उपशामुळेच वाईट अवस्था  गिरणा नदी कधीकाळी बाराही महिने वाहत होती. या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपलब्ध होत असल्याने या वाळूचा बेसुमार उपसा होत गेला आणि आजही सुरूच आहे. वास्तविक, नदीपात्रातील वाळूउपसा करण्यासंदर्भात शासनाची नियमावली आहे. मात्र वाळूमाफियांनी सर्व नियम धाब्यांवर बसवून वाळूचा बेसुमार उपसा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे तिची वाईट अवस्था करणारे गावागावांतील पुढारी असून, त्यांच्याविषयी यानिमित्ताने सर्वसामान्य ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गिरणा परिक्रमेच्या निमित्ताने खासदार उन्मेष पाटील हे दिवसाला तब्बल २५ ते ३० किलोमीटरचे अंतर पायी चालतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.