शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची खरेदी

औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला शनिवारपर्यंत (ता. ३१) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र मका, ज्वारी खरेदी न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाने मका विकण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
Will continue until Saturday Buy maize, sorghum
Will continue until Saturday Buy maize, sorghum

औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला शनिवारपर्यंत (ता. ३१) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र मका, ज्वारी खरेदी न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाने मका विकण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.

राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईतर्फे हमीभाव खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य मका व ज्वारी खरेदीची मर्यादा व मुदत वाढवून देण्याबाबत केंद्र शासनाला विनंती केली होती. त्यानुसार मका व ज्वारी खरेदीसाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिवाय ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्‍विंटलपर्यंत वाढवून देण्यात आले आहे. केंद्र शासनाने यापूर्वी मंजूर केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या ज्वारी खरेदीला वित्त विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मका व ज्वारी खरेदीसाठी यापूर्वी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय नोंदणी करूनही मका व ज्वारी खरेदी होऊ शकली नाही, अशा शेतकऱ्यांचा शेतमाल  खरेदीची प्रक्रिया यापूर्वी दिलेल्या उद्दिष्टाच्या मर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी २४९५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे संदेश पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६५ शेतकऱ्यांचा ४०६० क्‍विंटल ५० किलो मका खरेदी करण्यात आला. २३३० शेतकऱ्यांना खरेदीचे संदेश पाठविले. परंतू त्यांचा मका खरेदी झाला नव्हता.

मका खरेदीचा कालावधी पूर्ण झाल्याने ती बंद करण्यात आली होती. आता मुदतवाढ मिळाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्वी झाली व ज्यांना खरेदीसाठीचे एसएमएस आले, पण खरेदी होऊ शकली नाही, त्यांना या मुदतवाढीत आपला मका आधारभूत किमतीने खरेदीसाठी आणता येईल. - एस. के. पांडव, जिल्हा पणन अधिकारी, औरंगाबाद.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com