पाण्यासाठी महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या

पाण्यासाठी महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या
पाण्यासाठी महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या

बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथील पाणी प्रश्न पेटला आहे. पाण्यासाठी संतप्त महिलांनी शनिवारी (ता. ५) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन पाण्यासाठी हल्लाबोल केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या गावात तीन वेळा नळयोजना होऊनही नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याला ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. ही ग्रामपंचायत अनेक दिवसांपासून बंद होती. शनिवारी महिलांना ग्रामपंचायत कार्यालय उघडे दिसले. कार्यालयात सरपंच पती संजय पंचाळ व ग्रामसेवक मनोज मोरे होते. त्यामुळे महिलांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळविला.

पाणीटंचाईबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर काहीही उत्तर देऊ न शकण्याची नामुष्की सरपंच पती, ग्रामसेवकावर आली. त्यामुळे महिलांचा राग अनावर झाला. त्यांनी उपरोक्त अधिकारी, पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांच्या विरोधात नारेबाजी केली.  या गावची सुमारे एक कोटीची नळयोजना पूर्ण होऊनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. त्यामुळे गावातील महिला व पुरुषांमध्ये तीव्र संताप आहे. सुमारे १५० महिलांनी सकाळीच ८.३० च्या सुमारास आपला निषेध मोर्चा ग्रामपंचायतीवर नेला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com