सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक : शेखरसिंह

सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात राष्ट्रीयीकृत व इतर खासगी बँकेपेक्षा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस चालना मिळाली आहे. जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने दिलेल्या जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठा उद्दिष्टापैकी जिल्हा बँकेने १४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बँकेचे एकूण कामकाजच नेत्रदीपक आहे,’’ असे मत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक : शेखरसिंह
The work of Satara District Bank is spectacular: Shekhar Singh

सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात राष्ट्रीयीकृत व इतर खासगी बँकेपेक्षा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस चालना मिळाली आहे. जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने दिलेल्या जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठा उद्दिष्टापैकी जिल्हा बँकेने १४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बँकेचे एकूण कामकाजच नेत्रदीपक आहे,’’ असे मत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी व्यक्त केले.

नाबार्ड व शासनमान्य राज्यस्तरीय स्थायी समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील विविध पिकांसाठी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी काय दराने कर्जपुरवठा करावा, या साठी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक वाय.एस. पाटील, सुबोध अभ्यंकर, डॉ. धनंजय नावडकर, विजय माईणकर, डॉ. संतोष वीरकर, अभयसिंह शिंदे, भूषण यादगीरवार, रामदास कदम, बलभीम भोसले, खाशाबा पवार आदी उपस्थित होते.

शेखरसिंह यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन विविध नावीन्यपूर्ण योजना राबविणे, प्रमुख पिकांचे पीकनिहाय चर्चासत्र आयोजित करण्याच्या सूचना कृषी विभाग, पशुसंवर्धन व मत्स्य विभागाला दिल्या. 

डॉ. सरकाळे म्हणाले, ‘‘बँकेने जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या सहकार्याने ९७ टक्के विक्रमी कर्जवसुली केली. यामुळे शेतकऱ्यांना बँकेमार्फत व राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या व्याजपरतावा योजनांचा लाभ मिळेल. जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठ्यात जिल्हा बँकेचा ७३ टक्के वाटा आहे. प्रतिवर्षी पीक कर्जाचे १०० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण करीत आहे.’’

सभेमध्ये निमंत्रित सदस्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पिकांबाबत पीकनिहाय सखोल चर्चा करून हंगाम २०२२-२३ साठी पीकनिहाय २.५० टक्के ते २० टक्के पर्यंत पीक कर्जदरात वाढ करण्याची शिफारस केली. ही वाढ राज्यस्तरीय समितीस कळविण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर वाढीव कर्जदर हे एप्रिल २०२२ पासून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी तसेच जिल्हा बँकेला लागू होतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.