जागतिक कृषी संघटनेच्या सल्लागारांची नाचणी प्रात्यक्षिकांना भेट 

जागतिक कृषी संघटनेच्या सल्लागारांची नाचणी प्रात्यक्षिकांना भेट 
जागतिक कृषी संघटनेच्या सल्लागारांची नाचणी प्रात्यक्षिकांना भेट 

कोल्हापूर : दुर्लक्षित तृणधान्यांचा दैनंदिन आहारातील वापर वाढवण्याच्या दृष्टीने भारतात पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष म्हणून हे वर्ष साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफएओचे भारताचे सल्लागार डाॅ. राजशेखर यांनी पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, किसरुळ आणि पिसात्री येथील नाचणी बीजोत्पादन प्रात्यक्षिकांना भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी त्यांनी रोजच्या आहारात या लघु तृणधान्यांचा वापर वाढविण्यासाठी काय करता येईल याबाबतही जाणून घेतले. 

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. नंदकुमार कदम, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत पाटील, मंडल कृषी अधिकारी सदाशिव कारंडे, कृषी सहायक व्ही. आर. गायकवाड, नाचणी उत्पादक प्रयोगशील शेतकरी सर्जेराव पाटील, गणपती पाटील, चेतन मोहिते, मिलिंद पाटील, संभाजी पाटील, किसरुळचे उपसरपंच अरुण तळेकर आदी उपस्थित होते. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून नाचणी बीजोत्पादन कार्यक्रमाबाबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. परीट यांनी सविस्तर माहिती दिली. 

पन्हाळा तालुक्यात आत्माच्या माध्यमातून नाचणीसाठी चालू असलेले काम जागतिक स्तरावर दुर्लक्षित राहिलेल्या पण आरोग्याच्या दृष्टीने सद्यःपरिस्थितीत महत्त्व प्राप्त झालेल्या तृणधान्याचा प्रसार आणि आहारातील वापर वाढविण्यासाठी सादर केल्या जाणाऱ्या अहवालासाठी उदाहरण म्हणून उपयुक्त ठरेल, असे डाॅ. राजशेखर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com