आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी पिके

आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा लवकर न आल्याने पेरणी वेळत झाली नाही. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. परिणामी रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे.
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी पिके
This year in Ajra taluka Rabi crops on 300 hectares

आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा लवकर न आल्याने पेरणी वेळत झाली नाही. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. परिणामी रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे. तालुक्यात यंदा सुमारे ३२५ हेक्टरपर्यंत रब्बीचे क्षेत्र होते, यंदा ३०० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात पाटबंधारे प्रकल्पांमुळे पाण्याचे साठे मुबलक तयार झाले आहेत. याचा परिणाम पीक पद्धतीच्या बदलावर झाला आहे. त्यामुळे नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. यंदा अवकाळी पावसानेही रब्बी हंगामावर परिणाम झाला. तालुक्यात पंचवीस वर्षांपूर्वी रब्बीचे क्षेत्र सुमारे तीन हजार हेक्टरपर्यंत होते, पण या काही वर्षांत हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. रब्बीच्या क्षेत्रात सुमारे ९० टक्के घट झाली आहे. यामध्ये हरभरा, ज्वारी, वाटाणा, मसूर व पावटा ही पिके घेतली जात आहेत. 

तालुक्यात उत्तूर परिसरातील २२ गावांत रब्बीतील पीक आजही शेतकरी घेत आहेत, पण येथे आंबे ओहळ धरण झाल्याने पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम दोन-चार वर्षांत रब्बी पिकाचे क्षेत्र घटण्यावर होण्याची शक्यता आहे. ऊस लागवडीखाली जमिनीचे क्षेत्र वाढणार असल्याचे जाणकार सांगतात. 

तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लाकूडवाडी, सुळे, कोळिंद्रे, पोश्रातवाडी, हांदेवाडी, कोवाडे, पेद्रेवाडी, निंगुडगे, सरोळी, मलिग्रे या काही गावांत काही प्रमाणात रब्बीच पीक घेतली जातात. तालुक्याच्या पश्चिम भागात रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र अंत्यत कमी आहे. पश्चिम भागात गवे, हत्ती यासह वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी उसाचे पीक घेत आहेत. त्याचबरोबर या वीस वर्षांमध्ये चित्री, एरंडोळ, घाटकरवाडी, खानापूर, गवसे, धनगरमोळा पाणी प्रकल्प झाल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून उसाचे पीक घेत आहेत. 

  हरभरा १२१ हेक्टरवर 

आजरा तालुक्यात रब्बीचे एकूण क्षेत्र सुमारे ३०० हेक्टरपर्यंत आहे. हरभरा -१२१ हेक्टर, ज्वारी- ५६ हेक्टर, वाटाणा, मसूर, कांदा, पावटा, मका, भाजीपाला यासह अन्य पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com