'तुम्ही थांबा घरी, भाजीपाला, फळे मिळेल आपल्या दारी’

बुलडाणा ः सध्याच्या काळात जीवनावश्यक भाजीपाला व फळे ग्राहकांना घरपोच मिळावीत यासाठी सकाळी सात ते ११ या वेळेत बंधने शिथिल करण्यात आली आहेत. लोकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळांना बाजार मिळावा यासाठी आवश्यक ताजी फळे, भाजीपाला घरपोच पोचविण्याचा उपक्रम मेहकर तालुक्यात कमालीचा यशस्वी होत आहे.
You stop at home, get vegetables and fruits basket at your doorstep
You stop at home, get vegetables and fruits basket at your doorstep

बुलडाणा ः सध्याच्या काळात जीवनावश्यक भाजीपाला व फळे ग्राहकांना घरपोच मिळावीत यासाठी सकाळी सात ते ११ या वेळेत बंधने शिथिल करण्यात आली आहेत. लोकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळांना बाजार मिळावा यासाठी आवश्यक ताजी फळे, भाजीपाला घरपोच पोचविण्याचा उपक्रम मेहकर तालुक्यात कमालीचा यशस्वी होत आहे. 

मेहकर शहरातील नागरिकांना पैनगंगा शेतकरी स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून शारंगधर भाजीपाला बास्केट तसेच उसरण येथील बळीराजा शेतकरी स्वयंसहायता द्वारे एकत्रित फळांची बळीराजा फ्रुट बास्केट घरपोच पोचविली जात आहे. या सुविधेचे खासदार प्रतापराव जाधव, मदार संजय रायमुलकर, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना बास्केट घरपोच देऊन सुरुवात झाली. जिल्हा अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनात सुरू केलेल्या या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी यावेळी मेहकरचे उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख, तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतलवाड उपस्थित होते. 

बास्केट बुकिंगकरिता मेहकर कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने एक व्हाॅट्सअॅप संदेश व माहिती पत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व  भाजीपाला उत्पादनाची माहिती तसेच त्यांचे एक किलो, अर्धा किलो व एक पावचे विक्रीचे दर सुद्धा देण्यात आलेले आहेत. गटाच्या सदस्याच्या वतीने तसेच कृषी विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मार्फत सोशल मीडियाद्वारे याचा प्रसार केला जात आहे. 

नागरिकांमधून याला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज किमान ९० ते १००  बुकींग गटाला मिळत आहेत. संचारबंदीत नियमाचे पालन करणे क्रमप्राप्त असल्यामुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत ४०-५० बास्केट घरपोच देणे सध्या शक्य होत आहे.

या उपक्रमामुळे व्यापाऱ्यांची साखळी तोडण्यास मदत तर झालीच आहे. सोबतच आम्ही स्वतः आमचा जो शेतमाल पडून राहण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला होता तो दूर करण्यात यशस्वी झाले आहोत. याचा आम्हाला नक्कीच भविष्यात फायदा होईल.  - मनिष शेळके, विजय चांगाडे, अध्यक्ष, शेतकरी स्वयंसहायता गट

तालुक्यात शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने शेतकऱ्यांमार्फत विक्री चालू आहे. लॉक डाऊनमुळे भाव व्यवस्थित मिळत नाहीत. परंतु पडून राहणारा शेतमाल माल विक्री कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे होत आहे. यात आम्हाला समाधान आहे. - केशव खुरद, शेतकरी, रा. भोसा, ता. मेहकर जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com