‘शेतकऱ्यांना कापसाची हमीभाव किमतीच्या फरकाची रक्कम द्या’

परभणी : खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेंतंर्गत हमीभाव किमतीच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनचे युवा आघाडीचे सुधीर बिंदु, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्याकडे केली.
 ‘Guarantee of cotton to farmers Pay the price difference '
‘Guarantee of cotton to farmers Pay the price difference '

परभणी : खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेंतंर्गत हमीभाव किमतीच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनचे युवा आघाडीचे सुधीर बिंदु, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्याकडे केली. 

‘लॉकडाउन’मुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांची कापूस खरेदी तब्बल महिनाभरापासून बंद आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे मोठया प्रमाणावर कापूस शिल्लक आहे. कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील जवळपास ४७ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपली, परंतू, अद्याप पणन महासंघाची कापूस खरेदी सुरु झालेली नाही. 

तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे घरात कापूस ठेवणे धोकादायक ठरत आहे. कापसावर किडी आल्यामुळे शेतकऱ्यांना घरात वास्तव्य करणे अशक्य झाले आहे. खरेदीअभावी अडचणी वाढत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी दररोज २० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आहे. यामुळे कापूस खरेदीची गती कमी राहील. 

शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी करण्यास मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सर्व जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरु करावी. जास्तीजास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री केली आहे. यापुढेही खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करुन हमीभावातील फरकाची रक्कम त्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com