विद्युत वाहिनीच्या घर्षणाने उसाला आग

विद्युत वाहिनीच्या घर्षणाने उसाला आग
विद्युत वाहिनीच्या घर्षणाने उसाला आग

नाशिक : निफाड तालुक्यातील नैताळे गावाजवळ असलेल्या श्रीरामनगर येथील ऊस उत्पादक शेतकरी महेश भानुदास शिंदे यांच्या शेतातील गळीतास जाणाऱ्या उसास विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग लागली. त्यात सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. विद्युत वितरण कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रीरामनगर येथील शेतकऱ्यांनी केली.   

श्रीरामनगर शिवारात गट. नं. ५१८/१ हा महेश शिंदे यांचा मालाकीचा आहे. या गटात शिंदे यांनी उसाची लागवड केली. ऊस चालू वर्षी गळीतास जाणार होता. पण विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर अचानक दुपारी तीन वाजेच्या दरम्यान विद्युत वाहिनीत घर्षण झाले. त्यामुळे ठिणगी उडून उसाला आग लागली. त्यामुळे गटातील ०- ७७ आर ऊस जळाला.

 श्रीरामनगरचे कामगार तलाठी खडांगळे यांनी याचा पंचनामा करून निफाड तहसील कार्यालयास माहिती दिली. या वेळी सरपंच संपतराव खताळे, सोसायटीचे अध्यक्ष भीमराज काळे, पोलिस पाटील रवींद्र शिंदे, केशवराव पुंड, विनायक शिंदे यांनी पंचनाम्यावर सह्या केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com