अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृती

अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृती
अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृती

अमरावती ः रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन मिळावे याकरिता जागृती व्हावी. त्यासाठी विभागप्रमुखांना तालुके दत्तक देण्यात यावेत, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना दिले. जिल्ह्यात या वर्षी तीव्र दुष्काळ निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्यासोबतच पिकांसाठी पाण्याची सोय करताना ग्रामीण भागातील जनतेची चांगलीच दमछाक झाली. १४ हजार हेक्‍टरवरील संत्रा बागा पाण्याअभावी जळून गेल्या. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर यापुढील काळात जलसंधारणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. त्या अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी गावागावांत जागृती होणे अपेक्षित आहे. सर्व प्रशासकीय इमारती, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन घरकुल यांनाही रेन वॉटर हार्वेस्टिंगकरिता प्रोत्साहन करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पूरक जागृती अभियान खातेप्रमुखांच्या माध्यमातून राबविण्यासाठी पुढाकार घेतला जावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या येत्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुद्दा मांडला जाणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याच्या दृष्टीने हार्वेस्टिंगसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आगामी जल व्यवस्थापन समितीच्या सभेत हे मुद्दे मांडले जाणार आहेत.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com