
पांगरी, जि. सोलापूर ः ‘‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतरस्ते, गोठा, पाणंद रस्ते, विहिरी आदी कामे प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पंधरा दिवसांत कामे सुरू करावीत,’’ अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या.
बार्शी तालुक्यात झालेल्या विकास कामाचा आढावा व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निंबाळकर गावभेट दौऱ्यावर होते. त्यानिमित्त पांगरी (ता. बार्शी)येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते.
घोळवेवाडी, चिंचोली, पांढरी, पांगरी, शिराळे, पिंपळवाडी, वालवड, चारे, पाथरी, घारी या गावांचा दौरा त्यांनी केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, जि. प. सदस्या रेखा राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार दुनाके, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका आरोग्य अधिकारी अशोक ढगे, तालुका कृषी अधिकारी शहाजी वाघमारे, कृषी मंडलाधिकारी सोमनाथ साठे, कृषी सहाय्यक मदन तांबारे, मंडलाधिकारी विशाल नलवडे, वीज वितरणाचे अभियंता प्रदिप करपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, तलाठी विनोद मुंढे, श्रीकांत शेळके, कोतवाल अकुंश मुंढे, ग्रामसेवक सिद्धेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.
नागटिळक म्हणाले, ‘‘पांगरी सारख्या मोठ्या गावात सतत पाच विहिरींची कामे चालू असली पाहिजेत. मजुरांचा अभाव असल्यामुळे रोहयो योजना प्रभावीपणे राबविली जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला जातो. या योजनेमध्ये दुरुस्ती करून ३० टक्के कामे मशीनव्दारे, तर २० टक्के कामे मजूरांव्दारे अशी सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागाचा कायापालट होईल.’’
घोळवेवाडी येथे शेतरस्त्याची कामे, वाढीव विद्युत पुरवठा, नवीन विद्युत टाॅन्स्फाॅर्मर, कारी-घोळवेवाडी रस्ता, घोळवेवाडी -दुर्गादेवी रस्त्याची नव्याने मागणी करण्यात आली. चिंचोली-भानसगाव रस्त्याचे काम, पांगरी रेल्वेस्टेशन ते भवानी वस्ती रेल्वेलगत रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली. पांढरी येथे स्मशानभूमीसाठी रस्ता, ग्रामपंचायत इमारत, पांढरी-चोराखळी रस्ता, पांढरी-वडगाव रस्ता, पांढरी-उक्कडगाव रस्त्याची कामे करण्याची मागणी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.