शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा राहणार उपस्थित

पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख असलेल्या प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १८) सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा राहणार उपस्थित
Co-operative sector

शिर्डी : पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख असलेल्या प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) कार्यस्थळावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १८) सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. (amit shah to be presents for shirdi co operative conference)

या परिषदेस विविध सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंका व पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहातील, अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.

या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे उत्तर अहमदनगर जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डीचे नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, ज्ञानेश्‍वर गोंदकर, सभापती नंदा तांबे, डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे उपाध्यक्ष विश्‍वासराव कडू, ‘गणेश’चे उपाध्यक्ष प्रताप जगताप, अॅड. रघुनाथ बोठे, नंदू राठी, अशोकराव म्‍हसे, बाळासाहेब गाडेकर, रोहिणी निघुते, दिनेश बर्डे, सतीश बावके, कैलास तांबे, नंदकुमार जेजूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करून त्याचा कार्यभार अमित शहा यांच्याकडे सोपविला. त्यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती.

त्यांची भेट हा प्रवरा परिसराच्‍या दृष्‍टीने एक सुवर्णक्षण ठरेल. परिषदेत सहकार चळवळीसमोरील आव्हानांवर चर्चा होईल. चळवळीला नवी दिशा मिळेल. खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सहकार परिषदेच्‍या नियोजनाची माहिती दिली.

गोपीनाथ मुंडे जनमानसातील नेता भाजप नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचे पक्षविस्ताराबरोबरच सहकार चळवळीतदेखील मोठे योगदान होते. प्रवरानगर येथील कामगार सांस्‍कृतिक भवनाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. लोकांमध्ये राहणारा नेता, ही त्यांची खरी ओळख होती, अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.