कृषी निर्यात वाढीमध्ये अपेडाचे योगदान मोलाचे

देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीतील अपेडाचा वाटा पहायचा झाला तर तृणधान्य आणि फलोत्पादनात ५९ टक्के, तृणधान्य प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत २३ टक्के व मांस उत्पादनांच्या निर्यातीत १८ टक्के योगदान अपेडाने दिलेले आहे.
 agricultural export
agricultural export
भारतीय कृषी उत्पादने जागतिक बाजारात पोहचवण्यात अपेडाची (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. अपेडाने केलेल्या एकूण निर्यातीतील ५९ टक्के निर्यात बिगर बासमती तांदळाची आहे.
 
हेही वाचा - इराणकडून खरेदी मंदावल्याने भारताच्या बासमती निर्यातीत घट भारतीय कृषी उत्पादनाच्या निर्यातीचे महत्व पटल्यानंतर केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाकडून संसदेत कायदा करून अपेडाची स्थापना करण्यात आली. १३ फेब्रुवारी १९८६ साली स्थापन झालेल्या अपेडाने प्रारंभी ०.६ अब्ज डॉलर्सची निर्यात केली. गेल्या आर्थिक वर्षात अपेडाच्या निर्यातीचा आकडा २०.७६ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. याशिवाय भारताचा कृषी माल आता २०५ देशांमध्ये निर्यात केला जातो.  
 
हेही वाचा - महाराष्ट्रासह तीन राज्यात ४० बांबू FPO ला केंद्राची मान्यता कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा हा टप्पा अपेडाने काही सहजासहजी गाठलेला नाही. या वाटचालीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असल्याची माहिती अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी 'हिंदू बिझनेस लाईन'ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.       देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीतील अपेडाचा वाटा पहायचा झाला तर तृणधान्य आणि फलोत्पादनात ५९ टक्के, तृणधान्य प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत २३ टक्के व मांस उत्पादनांच्या निर्यातीत १८ टक्के योगदान अपेडाने दिलेले आहे.   चालू आर्थिक वर्षात अपेडाने २३.७ अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जानेवारी अखेरीस अपेडाने त्यातील १७२ अब्ज डॉलर्सची निर्यात करून त्यातील ७० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास अंगमुथू यांनी व्यक्त केला आहे.   कृषी उत्पादनांच्या निर्यातीत गतिमानता आणण्यासाठी अपेडाने काळाची पावले अचूकपणे ओळखत माहिती-तंत्रज्ञानाचा अंगीकार केलेला आहे. डिजिटल सिग्नेचर्स , इलेकट्रॉनिक पेमेंट फॅसिलिटी यांसारख्या सुविधांच्या वापरातून कागद विरहित कार्यालयाची संकल्पना राबवली आहे. विविध राज्यांतील भौगोलिक मानांकन प्राप्त स्थानिक गुणधर्म असलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर भर देण्याचा अपेडाचा प्रयत्न आहे. अपेडाने नवीन उत्पादनांसह निर्यात केंद्रांचाही शोध घेतला आहे. १५० भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांपैकी १०० उत्पादनांची नोंदणी ( तृणधान्य, फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेली उत्पादने) विशिष्ट अशा वर्गवारीत केली आहे. जळगावची केळी, डहाणूचे चिक्कू, शाही लिची, आंबा, भलिया व्हीट, मदुराई मल्ली, वझक्कलचे अननस, इत्यादी भौगोलिक मानांकने मिळालेल्या उत्पादनांचा या वर्गवारीत समावेश करण्यात आल्याचे अंगमुथू म्हणाले आहेत.     याशिवाय कुठली देशात कोणती उत्पादने विकल्या जाऊ शकतात याचा विचार करून अपेडाने तब्बल ६० देशांच्या तौलनिक अभ्यासातून कृषी निर्यातविषयक धोरणात्मक अहवाल तयार केले आहेत. याशिवाय अपेडाने मार्केट इंटेलिजन्स विभागही सुरु केला आहे. हा विभाग अपेडासाठी जागतिक बाजारपेठेचे विश्लेषण करतो.   आंबा, बासमती, बिगरबासमाती गायीचे मांस,डुकराचे मांस, म्हशीचे मांस, केली, बटाटे, शेवगा, वाईन, अंडी, गूळ, बिस्किट्स,  भुईमूग, अंगूर, आदी निर्यातीबाबतचे २७ अहवाल तयार केले आहेत.
व्हिडीओ पाहा -

शेतकरी-उत्पादक कंपन्या (एफपीसी), शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ ) आणि शेतकरी सहकारी संस्थांपर्यंत पोहचण्यासाठी अपेडाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. ३२९५ एफपीओ/ एफपीसी आणि ३३१५ निर्यातदार अपेडाच्या या संकेतस्थळाशी जोडले गेले आहेत.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com