बांबूपासून टूथब्रश बनविणारे 'बांबू इंडिया' स्टार्टअप

सध्या कृषी आणि कृषी आधारित व्यवसायांकडे शाश्वत उत्पन्नाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यातच आता पुण्यातील 'बांबू इंडिया' या स्टार्टअपची भर पडली आहे. बांबूपासून तयार केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याच्या हेतूने या स्टार्टअपची सुरूवात झाली आहे.
Bamboo India
Bamboo India

देशात गेल्या काही वर्षात कृषीमधील स्टार्टअपची (Agri Startup) संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले असताना कृषी क्षेत्राची कामगिरी मात्र उजवी राहिली होती. त्यामुळे सध्या कृषी आणि कृषी आधारित (Agri Baced Bussines) व्यवसायांकडे शाश्वत उत्पन्नाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यातच आता पुण्यातील 'बांबू इंडिया' (Bamboo India) या स्टार्टअपची भर पडली आहे. बांबूपासून तयार केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याच्या हेतूने या स्टार्टअपची सुरूवात झाली आहे. योगेश आणि अश्विनी शिंदे यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियामध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला. 

बांबू इंडियाच्या माध्यमातून बांबूशी निगडित पर्यावरण पूरक उत्पादने तयार केली जातात. तसेच ज्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचा वापर होता. अशा वस्तूंमध्ये प्लास्टीकऐवजी बांबूचा उपयोग केला जातो. बांबू इंडिया बांबूपासून अनेक वस्तू बनवते. यामध्ये बांबूपासून तयार केलेला टूथब्रश, पेन स्टँड, मोबाईल कवर अशा एक ना अनेक वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. 

२०१६ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आता पर्यंत जवळपास २० लाख किलो प्लास्टिक ऐवजी बांबूच्या वस्तू बनवल्या आहेत. योगेश शिंदे आणि त्यांची पत्नी अश्विनी यांनी सुरु केलेले बांबू इंडिया हे स्टार्टअप, बांबूशी निगडित, इको-फ्रेंडली उत्पादने बनवते. तसेच प्लास्टिकच्या वस्तूंना बांबूने बदलण्याच त्यांचं उद्दिष्ट आहे.

व्हिडीओ पाहा - 

दरम्यान, केंद्र सरकार बांबूच्या शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. नुकतीच केंद्र सरकारने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, ओडीशा आणि आसम या राज्यात ४० बांबू एफपीओना मान्यता दिली आहे. बांबू इंडिया या स्टार्टअपने आत्तापर्यंत चार हजार शेतकऱ्यांना रोजगार दिला आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बांबू उत्पादक देश आहे. याशिवाय बांबूच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. फक्त टूथब्रश उत्पादकांसाठी काम करत असलेले हे स्टार्टअप आता थेट लोकांपर्यंत पोहचत आहे. आपल्या कल्पनेला आणि प्रयत्नांना विचारांची आणि आधुनिकतेची जोड देत शार्क टँक इंडिया सारख्या रियालिटी शो पर्यंत पोहचलेल्या या स्टार्टअपने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com