Because of the Russia Ukraine war food prices are skyrocketing
Because of the Russia Ukraine war food prices are skyrocketing

रशिया-युक्रेन संघर्षामुळे जगासमोर खाद्यसंकट !

रशिया-युक्रेन संघर्षामुळं जगासमोर खाद्य संकट निर्माण झाली. या दोन देशांकडून होणाऱ्या कृषीमालाच्या पुरवठ्यावर अवलंबून देशांचे हाल सुरु आहेत. खाद्यान्नाच्या किमती गगनाला भिडल्यात.

रशिया- युक्रेन संघर्षामुळं (Russia-Ukraine War) निर्माण झालेलं खाद्य संकट (Food Crisis) अत्यन्त गंभीर असून दुसऱ्या जागतिक महायुद्धांनंतर जग प्रथमच अशा खाद्य संकटाला सामोरे जात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचे कार्यकारी संचालक डेव्हिड बेसली यांनी सुरक्षा समितीला दिलीय.

जगातल्या काही देशांची गव्हाची गरज भागवणारे युक्रेनियन शेतकरी सध्या रशियासोबतच्या युद्धात गुंतले आहेत. ज्यामुळं युक्रेनमधून त्या देशांना होणारा धान्य पुरवठा खंडित झालाय. युद्धामुळं खाद्यान्नाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीय. १२ कोटी ५० लोकांना खाद्य पुरवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पार पाडण्यात येत असल्याचं बेसली यांनी सुरक्षा समितीला सांगितलं आहे.

युद्धामुळे इंधन, कृषी उत्पादनांसकट कृषी मालाच्या वाहतुकीच्या दरांतही प्रचंड वाढ झालीय. ज्याचा परिणाम म्हणून बहुतांशी कृषी मालाची (Agriculture Produce)निर्यात करणाऱ्या देशांनी कृषी मालाच्या निर्यात थांबवून देशांतर्गत गरजा भागवण्यावर भर द्यायला सुरुवात केलीय.

युक्रेनमधून होणाऱ्या धान्यपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या देशांना या खाद्यसंकटाची तीव्रता जाणवतेय. इजिप्त ८५ टक्क्यांहून अधिक कृषी उत्पादने (Agriculture Product)युक्रेनमधून आयात करतो, तर लेबनानही युक्रेनमधून होणाऱ्या धान्य पुरवठ्यावर अवलंबून असतो. रशिया आणि युक्रेनमधील धान्याच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांचे हाल सुरु असल्याचंही बेसली म्हणालेत. या दोन्ही देशांकडून कृषी मालाची वाहतूक खंडित करण्यात येते आहे. याचा सर्वाधिक फटका युक्रेनमधील गव्हाच्या पुरवठ्यावर विसंबून असलेल्या मोरोक्को, पाकिस्तान, लिबिया, येमेन, ट्युनिशिया, लेबनान या देशांना बसतोय.

अगदी रशियन बंदावरून कृषी उत्पादने जागतिक बाजारात घेऊन जाण्यासाठी वाहतूकदार तयार नाहीत. रशियाकडूनही युक्रेनकडून होणाऱ्या निर्यातीवर बंधने घालण्यात आल्याने धान्याच्या किमती आकाशाला गवसणी घालयताना दिसत असल्याचं अमेरिकेच्या गृह विभागाचे सचिव वेन्डी शेरमन यांनी म्हटलं आहे. या परिस्थितीसाठी रशिया अन युक्रेन परस्परांना जबाबदार ठरवत आहे. अमेरिका आणि मित्र देशांनी रशियावर घातलेल्या निर्बंधामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघातील दूत वसिली नेबेन्झिया यांनी सांगितलं आहे. रशियन लष्कराकडून नागरी हालचालींवर बंधने घालण्यात येत नसल्याचा दावाही वसिली यांनी केलाय. रशियावरील निर्बंध मागे घेणं हाच समस्येवरील एकमात्र उपाय असल्याचं रशियाचं म्हणणं आहे.

फ्रान्स आणि मेक्सिकोने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडे तात्काळ बैठक घेऊन युक्रेनमधील परिस्थितीबाबत तोडगा काढण्याचा आग्रह धरलाय. यासंदर्भात नकाराधिकार Veto)असलेल्या रशियानेच सामंजस्य दाखवण्याची गरज असल्याचं फ्रान्सच्या निकोलस डी रिव्हेरे यांनी समितीला सांगितलंय. रशियाने रशिया आणि युक्रेनमधून होणारा धान्य पुरवठा पूर्ववत करण्यासाठी संघर्ष थांबवावा, ज्यामुळे जगासमोरील खाद्यसंकटावर मार्ग निघेल, असा आशावाद निकोलस यांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com