Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतीसाठी करण्यात आलेल्या 10 घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प - 2022-23 मध्ये शेती क्षेत्रासाठी केलेल्या 10 घोषणा कोणत्या, वाचा सविस्तर...
Budget 2022
Budget 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (finance minister) यांनी आज सकाळी 11 वाजता लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प (budget 2022-23) सादर केला. त्यात शेती क्षेत्रासाठी 10 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. अशा आहेत या 10 घोषणा -

मुद्दा क्र. 1

- गव्हाची सरकारी खरेदी - 1208 लाख टन 

- 163 लाख शेतकऱ्यांकडून तांदळाची सरकारी खरेदी

- 2.37 लाख कोटी रुपयांचे थेट लाभार्थी हस्तांतरण होणार

मुद्दा क्र. 2

- रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला (chemical free farming) देशभरात प्रोत्साहन देणार

- पहिला टप्पा : गंगा नदीच्या (river ganga) किनारवर्ती भागात प्रोत्साहन

- कृषी विद्यापीठ अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश (agriculture syllabi)

मुद्दा क्र. 3

- 2023 : आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचं निमित्त साधणार (international millets year)

- भरडधान्यांच्या काढणीपश्चात मुल्यवर्धनाला पाठबळ (post harvest value addition)

- भरडधान्यांचा देशांतर्गत वापर वाढवण्याचं उद्दिष्ट (millet consumption)

- भरडधान्य उत्पादनांचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंग (branding of millet products)

मुद्दा क्र. 4

- खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा मानस (reduce dependence on oil import)

- देशांतर्गत तेलबिया निर्मिती वाढवण्यासाठी योजना (increasing domestic production of oilseeds)

- युक्तीसंगत, सर्वंकश विचाराने योजनेची अंमलबजावणी

मुद्दा क्र. 5

- शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्याचे लक्ष्य (digital and hightech services for farmers)

- पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप : PPP तत्वावर योजना आखणार (PPP project)

- संशोधन आणि विस्ताराच्या सरकारी संस्थांना सोबत घेणार (R&D institution)

- खाजगी ॲग्रीटेक, शेती मुल्यसाखळीतील भागधारकांची मदत (private agritech stakeholders)

मुद्दा क्र. 6

- पीक पाहणीसाठी तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य (crop assessment)

- त्यासाठी ‘किसान ड्रोन’च्या वापराला प्रोत्साहन (use of drone)

- भूमिअभिलेखांच्या डिजिटायजेशनसाठी ड्रोनचा वापर (digitization of land records)

- ड्रोनद्वारे किटकनाशक आणि खतांची फवारणी

मुद्दा क्र. 7

- कृषी विद्यापीठ अभ्यासक्रमात बदलासाठी राज्यांना प्रोत्साहन

- नैसर्गिक शेती, झीरो बजेट, आणि सेंद्रिय शेतीचा हवा समावेश (natural farming, zero budget farming, organic farming)

- आधुनिक शेती, मुल्यवर्धन, आणि व्यवस्थापनाचे धडे सामील (modern agriculture, value addition)

मुद्दा क्र. 8

- ‘नाबार्ड’ अंतर्गत सह-गुंतवणूक निधी उभारणीस पाठबळ (NABARD)

- ॲग्री स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांसाठी निधीचा वापर (agri startups)

- शेतीमाल मुल्यसाखळीशी संबंधीत उद्योगांना कर्जपुरवठा

- शेतकरी उत्पादक संस्था, भाडेतत्वावरील शेती, तंत्रज्ञानासाठी (FPOs) निधी मिळण्याची सोय केली जाणार

मुद्दा क्र. 9

- केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी करणार (river linking project)

- या नदीजोड प्रकल्पासाठी 44,605 कोटी रुपयांची तरतूद

- प्रकल्पाद्वारे नऊ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार (irrigation of farmland)

- 62 लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार

- 103 मेगावॉट क्षमतेच्या जलविद्यूत प्रकल्पाची निर्मिती

- पाच नदीजोड प्रकल्पांच्या ब्लुप्रिंटला मान्यता

- दमणगंगा - पिंजाळ नदीजोड प्रकल्पाचा समावेश

- परतापी-नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार, पेन्नार-कावेरी या नद्या जोडल्या जाणार

- लाभार्थी राज्यांच्या सहमतीनंतर केंद्राकडून पतपुरवठा होणार

हा व्हिडिओ पाहिलात का? :   मुद्दा क्र. 10

- फळपिके आणि भाजीपाल्याच्या सुयोग्य वाणांचा (suitable varieties) वापर व्हावा आणि आधुनिक उत्पादन आणि काढणी तंत्रज्ञानाचा (harvesting technology) वापर करावा, यासाठी राज्यांच्या सहभागाने पॅकेज देण्यात येणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com