जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा मजबूत राहणार 

कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून व्हिएतनाममधील उत्पादनांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतातील उत्पादन आणि वापरावरही काही आठवडे परिणाम झाला आहे.
जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा मजबूत राहणार 
Cashew

पुणे - २०२२ मध्ये जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा (Cashew Supply) सुरळीत राहणार असून मागणीही मजबूत राहणार आहे. त्याचवेळी कोरोनामुळे (Covid-19) असणारी अनिश्चितता आणि दळणवळणाच्या आव्हानांचा सामना आणखी एक वर्ष सुरू राहू शकतो. ज्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता आहे. 

जगातील काजू उत्पादनात (Cashew Production) आफ्रिकेचा (Africa) वाटा आधीच जवळपास ६० टक्के इतका असून सर्वात मोठा उत्पादक आयव्हरी कोस्टचे काजू उत्पादनात  एक दशलक्ष टन योगदान आहे.  गेल्या २-३ वर्षांत आफ्रिकेतील प्रक्रियेत लक्षणीय वाढ झाली आहे. कंबोडियातून (Cambodia) व्हिएतनामला (Vietnam) होणाऱ्या कच्च्या काजूची निर्यात जानेवारी-नोव्हेंबर २०२१ मध्ये ४४५ टक्क्यांनी वाढून दोन लाख १० हजार टनांवरून ११ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षातील अहवालानुसार आणि चालू वर्षातील पिकामध्ये वाढ लक्षात घेता, कंबोडियाची कच्च्या काजूची आयात तीन लाख ५० हजार ते चार लाख टन असण्याचा अंदाज आहे. 

कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून व्हिएतनाममधील उत्पादनांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतातील उत्पादन आणि वापरावरही काही आठवडे परिणाम झाला आहे. मात्र आफ्रिकेतून होणाऱ्या पुरवठ्यावर किंवा आयात करणाऱ्या देशांमधील वापरावर फारसा परिणाम झाला नाही.

इंटरनॅशनल नट्स अँड ड्राय फ्रूटचे भारतातील राजदूत प्रताब नायर यांनी संकेत दिले आहेत की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे भारतातील मागणीत थोडीशी नरमाई आली आहे. परंतु ही लाट कमी झाल्यावर मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे. तथापि, काजू हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अन्न म्हणून ओळखले जात असल्याने त्याला जगभरात मागणी चांगली आहे. पश्चिम आफ्रिका आणि भारतात उत्पादन सामान्य राहणार असून व्हिएतनाम आणि कंबोडियामध्ये अवकाळी पावसामुळे उशीराची पिके येण्याची शक्यता आहे. भारतातून होणारी निर्यात ही कदाचित इतिहासातील सर्वात कमी होती आणि केवळ काही विशिष्ट खरेदीदार उच्च भारतीय किंमती देण्यास इच्छुक होते. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.