महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

केंद्रीय अन्न मंत्रालयाने जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत ८५९.११ कोटी लिटर इथोनॉल निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या १९६ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
Ethanol

वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government) ८५९ कोटी लिटरच्या १९६ धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पांना (Ethanol Project) मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रासह (Maharashatra) उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये प्रमुख म्हणून उदयास आली आहेत. केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी योजना जाहीर केल्यानंतर गेल्या एका वर्षात मंजुर झालेल्या एकूण प्रकल्पांपैकी ४० टक्क्यांहून अधिक प्रकल्पांना आकर्षित केले आहे.   

केंद्रीय अन्न मंत्रालयाने (Union Food Ministery) जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत ८५९.११ कोटी लिटर इथोनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्याची क्षमता असलेल्या १९६ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील एकूण १०७.३८ कोटी लिटर क्षमतेच्या ३५ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. तर उत्तर प्रदेशातील १०८.७४ कोटी लिटर क्षमतेच्या २९ प्रकल्पांना आणि छत्तीसगडमध्ये १०२.०३ कोटी लिटर क्षमतेच्या २० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.      

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.