cotton market : कापूस बाजार मजबूत राहणार

पंजाब आणि हरियानात पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादन घटले आहे. व्यापारी सुत्रांच्या मते कापसाची गुणवत्ता घटली असून रंगही बदलला आहे.
cotton market : कापूस बाजार मजबूत राहणार
cotton

पुणे: फाॅरेन ॲग्रीकल्चरला सर्व्हिसेसच्या मते भारतात २०२१-२२ च्या हंगामात १२४ दशलक्ष हेक्टरवर २७७ लाख खंडी कापूस उत्पादन होईल, एक खंडी म्हणजेच ४८० बुशेल्स कापूस. अवेळी पडलेला पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे (pink bowl worm) उत्तर भारतात कापसाचे उत्पादन (cotton production) घटले आहे. यंदा देशात २६० लाख खंडी कापूस वापर होण्याचा अंदाज आहे. तर सूत (yarn) आणि कापड निर्यातीला (textile export) मोठी मागणी असल्याने कापसाला उठाव आहे, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मुंबई येथील फाॅरेन ॲग्रीकल्चरला सर्व्हिसेसने म्हटले आहे. यंदा कापूस दराला मजबूती देण्यारी स्थिती असल्याचं अहवालातून स्पष्ट झाले आहे.

फाॅरेन ॲग्रीकल्चरल सर्व्हिसेसच्या (Foreign Agricultural services) मते देशात २७७ लाख खंडी कापूस उत्पादन होईल. हे उत्पादन युएसडीएच्या अंदाजापेक्षा तीन लाख गाठींनी कमी आहे. पंजाब आणि हरियानात पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादन घटले आहे. व्यापारी सुत्रांच्या मते कापसाची गुणवत्ता घटली असून रंगही बदलला आहे. फाॅरेन ॲग्रीकल्चरला सर्व्हिसेसच्या मते देशातील कापूस उत्पादकता ४८६ किलो प्रतिहेक्टर राहण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सुधारले आहेत. सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षा ५० टक्के अधिक आहेत. हे ही वाचाः कापूसदर टिकून राहण्यास पूरक स्थिती

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशातील बाजारांत ३१ डिसेंबरपर्यंत १३४.८ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. एक कापूस गाठ १७० किलो कापसाची असते. देशातील कापूस उत्पादन अंदाजाच्या ३७ टक्के कापूस बाजारात आला आहे. मागील वर्षी याच काळातील कापूस आवक १९ टक्के अधिक होती. मात्र मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही आवक काहीशी जास्त आहे. देशातील कमी उत्पादन आणि शेतकऱ्यांनी माल रोखल्याने बाजारात कमी आवक झाली आहे. हे ही वाचाः पांढरं सोनं उद्योगाच्या डोळ्यात का खुपतंय?

देशातील कापूस वापर यंदा २६० खंडी म्हणजेच ३३३ लाख गाठी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. म्हणजेच २७७ खंडी उत्पादन आणि वापर २६० लाख खंडी होण्याची शक्यता आहे. तर आयात १० लाख खंडीची होईल. सूत आणि कापड निर्यातीला असलेल्या मागणीमुळे यंदा कापूस वापर वाढणार आहे. यंदा देशातून ५९ लाख खंडी म्हणजेच ७६ लाख गाठी कापूस निर्यातीचा अंदाज आहे. हा अंदाज युएसडीएच्या अंदाजापेक्षा अधिक आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या मते नोव्हेंबरमध्ये देशातून कापसाची निर्यात दीडपट झाली आहे. मात्र यंदाच्या हंगामातील कापसाची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यानी कमी आहे. यंदा लाॅजिस्टीकसह वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच केंद्र सरकराने कापडावरील जीएसटी वाढीच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने कापड उद्योगाला दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम मिल्सच्या कार्यक्षमतेवर होत आहे.   

हा अहवालाचं विश्लेषण थोडक्यात करायचं झाल्यास देशात यंदा २७७ लाख खंडी कापसाचे उत्पादन आणि आयात १० लाख खंडी होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत वापर २६० लाख खंडीचा राहिल. तर निर्यात ५९ लाख खंडी होईल, असे फाॅरेन ॲग्रीकल्चरला सर्व्हिसेसने म्हटले आहे. म्हणजेच देशात पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक राहिल, असा हा अहवाल सांगतो. याचाच अर्थ असाही होतो की देशातील कापूस दराला या मागणीचा आधार मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व परिस्थितीचा आणि बाजाराचा आढावा घेऊन कापूस विक्री करावी.

देशातील व्यापार आणि उद्योगाच्या मते कापूस उत्पादन ३२० लाख गाठींच्या दरम्यान राहिल. युएसडीएचा सुधारित अंदाज वेगळा असण्याची शक्यता आहे. उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांना माल ठेवल्याने बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे कापूस दरात वाढ झाली आहे. बाजारात मुलभूत घटक म्हणजेच फंडामेन्टल्स दर टिकून राहण्यास मजबूत आहेत. - अजय केडिया, संचालक, केडिया ॲडव्हायजरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.