पेट्रोल, डिझेलनंतर घरगुती गॅस ५० रुपयांनी महागला

मागील वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic Cooking Gas) दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरही (Domestic Cooking Gas) ५० रुपयांनी महाग झालाय. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
 Domestic Cooking Gas Price Hiked ₹ 50 Per Cylinder
Domestic Cooking Gas Price Hiked ₹ 50 Per Cylinder

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडालाय. सर्वसामान्य जनतेचा खिसा मंगळवारपासून कापला जाणार आहे. महागाईची झळ आणखी तीव्र होणार असून, पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलिंडरही (Domestic Cooking Gas) महाग झालाय. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ती शक्यता आता खरी ठरलीय.   मागील वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic Cooking Gas) दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरही (Domestic Cooking Gas) ५० रुपयांनी महाग झालाय. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

कोणत्या शहरात कसे असणार घरगुती गॅसचे दर ? 

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आले होते. त्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरची  (Domestic Cooking Gas) दरवाढ झाली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ९४९.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

व्हिडीओ पहा- 

कोलकातामध्ये ९७६ रुपये, तर चेन्नईत ९६५.५० रुपये इतका दर झाला आहे. लखनौमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ९८७.५० रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलिंडरच्या दराने १००० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर १०३९.५० रुपये झाला आहे.

किचन बजेट बिघडणार

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com