उसाच्या वाड्यावर नेमका अधिकार कुणाचा?

यंदा उसाला एफआरपी किती मिळणार? यावर गावागावात चर्चेचे फड रंगतात. हे झालं उसाचं. पण उसाला समांतर असं उसाच्या वाड्याचंही एक वेगळचं अर्थकारण आहे.
Sugarcane Fodder
Sugarcane Fodder

पुणे - उसशेतीचं वेगळचं अर्थकारण आहे. दरवर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू व्हायच्या अगोदर उसाच्या दराची (Sugarcane Rate) चर्चा सुरू होते. यंदा उसाला एफआरपी (FRP) किती मिळणार? यावर गावागावात चर्चेचे फड रंगतात. हे झालं उसाचं. पण उसाला समांतर असं उसाच्या वाड्याचंही (Sugarcane Fodder) एक वेगळचं अर्थकारण आहे. कारण ज्या शेतकऱ्याच्या रानातला ऊस कारखाना तोडून नेतो, त्याच उसाचं राहिलेलं वाडं उसतोड मजूर, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक घेऊन जातात. मात्र, ज्या शेतकऱ्यानं त्याच्या रानात ऊस पिकवला त्यालाच त्याच्या फडातलं हे वाडं घरच्या जनावरांना मिळावं म्हणून उसतोड मजुरांच्या आणि ट्रॅक्टर मालकाच्या मिनत्त्या कराव्या लागतात. मग हा प्रश्न निर्माण होतो की, उसतोडीनंतर शिल्लक राहिलेल्या उसाच्या वाड्यावर अधिकार कोणाचा?

उसाप्रामाणेच उसाच्या समांतर वाड्याचं अर्थकारण आहे. बैलगाडी असो छकडा असो ट्रॅक्टर  किंला ट्रक असो नाहीतर आत्ता आत्ता आलेले नवीनच हारवेस्टर (Sugarcane Harvester) असो. हे सगळेच शेतकऱ्यांचे जावाई असल्यासारखे वागतात. आपल्या उसाची लवकर तोड व्हावी म्हणून शेतकरी वाट पाहत असतो. उसावर तोड आलीच तर मजुरांचा वेगळाच रुबाब असतो.  त्यातही रविवारी तोड आली तर मटणाची,कोंबड्याची मागणी होते. मागणी पूर्ण नाही झाली तर आठ-आठ दिवस गायब होतात.

व्हिडीओ पाहा - 

गेल्यावर्षी उस्मानाबादचे शेतकरी अशोक पवार यांनी या समस्येबाबात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवला होता. अजित पवार यांनी या संदर्भातील नियम बदलले खरे, पण ऊस तोडणाऱ्यांच्या वर्तनात बदल झाला नाहीच. कोणत्याही कारखान्याच्या यार्डात (SugarMill Yard) संध्याकाळी चक्कर मारली, तर शेकडो वाहने वाडे विकत घेऊन जातात. ४-५ वाड्याच्या एका पेंढीचा, भेंड्याचा भाव शेकडा ४५० रुपये चालु आहे. उसतोड मजुरी म्हणजे तोडणी व ओढणी ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या FRP मधूनच कापून घेतली जाते. आणि त्याच शेतकऱ्याला घरच्या जनावराला वाडं मिळावं म्हणून आशाळभूत नजरेनं गाडीवानांकडे बघत असतात. गाडीवान मात्र उपकार केल्यासारखा त्याला दोन चार पेंढ्या ठेवल्याचं सांगतो. इथे शेतकऱ्याची अवस्था म्हणजे ''आपलीच मोरी आणि अंघोळीची चोरी अशी असते''. मग उसाच्या वाड्यावर नेमका अधिकार कोणाचा? हा प्रश्न उरतोच. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com