राज्यात थंडीची लाट पसरणार : हवामानशास्त्र विभागाचा इशारा

वाऱ्यांच्या चालीमुळे ही लाट महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं काल वर्तवली होती. त्यात आता ही लाट राज्यात अजून काही जिल्ह्यांमध्ये पसरणार असल्याचंविभागानंम्हटलंय. ही लाट कधी आणि कोणत्या जिल्ह्यात येणार, जाणून घ्या सविस्तर...
राज्यात थंडीची लाट पसरणार : हवामानशास्त्र विभागाचा इशारा
Cold Wave in Maharashtra

पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम किनारपट्टीतून आत शिरलेल्या धुळीच्या वादळामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या कित्येक जिल्ह्यांमध्ये दिवसभर धुळ आणि धुक्याचं साम्राज्य होतं. देशातल्या वायव्य भागात थंडीची लाट (cold wave) कायम असून जबर बर्फवृष्टीही होत आहे. वाऱ्यांच्या चालीमुळे ही लाट महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) काल वर्तवली होती. त्यात आता ही लाट राज्यात अजून काही जिल्ह्यांमध्ये पसरणार असल्याचं विभागानं म्हटलंय. त्यामुळे येते पाच दिवस राज्यासाठी थंडीचेच असतील, हे आता जवळपास स्पष्ट होत चाललंय.

पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिला आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai)

म्हणूनच मुंबई वेधशाळेनं पुढील 48 तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस (cold day) राहण्याचा इशारा दिलाय. 26 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि नाशिक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट (yellow alert) जाहीर करण्यात आलाय. तर आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, आणि जालना जिल्ह्यांमध्येही थंड दिवस आणि काही ठिकाणी थंडीची लाट येऊ शकते, असं मुंबई वेधशाळेच्या (RMC Mumbai) दैनंदिन हवामान अंदाजात म्हटलंय.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

तर दुसरीकडे नागपूर वेधशाळेनं (RMC Nagpur) 26 जानेवारीसाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जाहीर केलाय. तर 27 जानेवारीसाठी वर्धा, नागपूर, आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आलाय. तसंच आज बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, आणि गोंदियात थंडीची लाट पसरणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं दिलाय.

Next 5 days weather warning for Vidarbha Dated 25.01.2022 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/4ce7b7ro3e

— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur)

गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, आणि वऱ्हाडातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती. आता या भागांमध्ये गारठा वाढला असून, सुर्यप्रकाशाचा जोर कमी पडताना दिसतोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.