पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र वाढले

पुणे : पुणेविभागात २३ सप्टेंबरअखेरपर्यंत आडसाली उसाची ९७ हजार ४०८ हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या पावसामुळे आडसाली ऊस लागवड देखील वेळेवर सुरू झाली. आॅगस्ट व  सप्टेंबरमध्ये झालेल्या अति पावसामुळे लागवड खोळंबल्याची स्थिती आहे. तरीही पुणे विभागात २३ सप्टेंबरअखेरपर्यंत आडसाली उसाची ९७ हजार ४०८ हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

जूनच्या सुरुवातीपासून झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, डिंभे, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत अशी जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळू लागले आहेत. जून, जुलै महिन्यात पावसाचा थोड्याफार प्रमाणात खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला.

परिणामी आडसाली ऊस लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ हजार ७८९ हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ४९ हजार ६१९ हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. मात्र, यंदा जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीवर भर दिला आहे. 

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात ऊस लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाची प्रामुख्याने लागवड होते. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यांना तोडणीस देतात.    

जिल्हानिहाय आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये) 
जिल्हा    सरासरी क्षेत्र झालेली लागवड टक्के
नगर १,०२,६१३ ३३,६१९ ३२
पुणे   १,३०,६३१ ४०,०५२ ३०
सोलापूर १,३७,५३६ २३,७३७ १७
एकूण   ३,७०,७८१ ९७,४०८ २६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com