युपीत गोवंशाचा मुद्दा भाजपच्या अंगलट; योगींच्या सभास्थळी शेतकऱ्यांनी सोडली मोकाट जनावरे

निवडणुकीतील अनेक मुद्यांपैकी युपीतील मोकाट जनावरांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजपविरोधी पक्षांनी राज्यातील मोकाट जनावरांचा मुद्दा लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२२) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाराबंकी येथील सभास्थळी शेतकऱ्यांनी शेकडो मोकाट गायी आणि बैलांना सोडून दिले.
UP Election
UP Election

देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यापैकी आख्ख्या देशाच्या नजरा या उत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Election) निवडणुकीकडे लागल्या आहेत. निवडणुकीतील अनेक मुद्यांपैकी युपीतील मोकाट जनावरांचा (Stray Animals) मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजपविरोधी पक्षांनी राज्यातील मोकाट जनावरांचा मुद्दा लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२२) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या बाराबंकी येथील सभास्थळी शेतकऱ्यांनी शेकडो मोकाट गायी आणि बैलांना सोडून दिले. मोकाट जनावरांना हाकलण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि प्रशासनाची धावपळ उडाली होती.

बाराबंकी में छुट्टा जानवरों का वीडियो सोमवार को सपा MLC राजेश यादव ने शेयर किया था जो काफी वायरल हुआ। हरकत में आये प्रशासन ने सभास्थल से सभी पशुओं को हटवा दिया बीजेपी नेताओं ने इसे सपा की साजिश बताया है। बाराबंकी पुलिस का कहना है कि मंगलवार को इस प्रकार की कोई घटना नहीं हुई https://t.co/a2qmMVJXBH

— Ramandeep Singh Mann (@ramanmann1974)

युपी विधानसभा निवडणुकीत राज्यातील मोकाट जनावरांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मोकाट जनावरांचा प्रामुख्याने राज्यातील शेतीला (Agriculture) आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा अंदाज योगी यांच्या सभास्थळी शेतकऱ्यांनी सोडलेल्या मोकाट जनावरांवरून लावता येऊ शकतो. कारण राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा (Ban Cow Slaughter Act) अस्तित्वात आल्यापासून मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनावरे शेतात घुसून पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना जागता पहारा द्यावा लागत आहे. यामुळे येथील शेतकरी चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र आहे.    

हेही वाचा - भटक्या जनावरांनी उडवलीय भाजपची झोप ? योगींच्या सभास्थळी गायी आणि बैल सोडण्यावर शेतकरी म्हणतात की, मोकाट गायी, बैलांमुळे किती त्रास होतो, हे मुख्यमंत्र्यांनाही कळायला हवे. शेतकऱ्यांनी गावांमधून योगींच्या सभास्थानी गायी, बैलांना हाकून आणल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.  

राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर भटक्या जनावरांचे तांडेच्या तांडे दिसत आहेत. या मोकाट जनावरांमुळे बरेच शेतकरी अडचणीत आले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी योगींच्या जाहीर सभेपूर्वी मोठ्या प्रमाणात गायी आणि बैल सभास्थळी हुसकावून आणले होते. मोकाट जनावरांपासून दिलासा देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवासांपूर्वी फतेहपूर येथील सभेत पंतप्रधान मोदींनी युपीतील मोकाट जनावरांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. १० मार्चला भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ही समस्या दूर केली जाईल, असे मोदी म्हणाले होते. जी मोकाट जनावराच्या शेणातून पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. या दिशेने आम्ही काम करत आहोत, असेही मोदी म्हणाले होते.   दरम्यान, सत्तेत आल्यानंतर योगींनी गोवंश हत्याबंदी कायदा केला. या कायद्यामुळे गोवंशाच्या हत्या करण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे राज्यातील भाकड जनावरांच्या संख्येत वाढ होत गेली. भाकड जनावरे सांभाळणे परवडत नाही म्हणून ती सोडून दिली जातात. परिणामी मोकाट जनावरांची संख्या वाढत गेली. या मोकाट जनावरांचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी योगींना मोकाट जनावरांचा त्रास समजावा म्हणून त्यांच्या सभास्थानी गायी, बैल सोडून दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com