कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे अनुदान

ड्रोन खरेदी करण्यासाठी या संस्थांना १०० टक्के अनुदान अथवा १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपन्यांनाही (FPO) ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत हे अनुदान वा निधी मिळवता येणार आहे.
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे अनुदान
agricultural-drones-1.jpg

कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान (subsidy) देण्याचे धोरण राबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

प्रात्यक्षिकासाठी ड्रोनची  खरेदी, भाडेतत्वावरील वापर करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून अनुदानविषयक नियमावली (guidelines)जारी करण्यात आली आहे.

 केंद्रीय कृषी मंत्रालय कृषी यांत्रिकीकरणावरील उप-अभियानांतर्गत कृषी संशोधन संस्था (ICAR), कृषी विज्ञान केंद्र आणि राज्यातील कृषी विद्यापिठांना ड्रोन वापरासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे.  

ड्रोन खरेदी करण्यासाठी या संस्थांना १०० टक्के अनुदान अथवा १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपन्यांनाही (FPO) ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत हे अनुदान वा निधी मिळवता येणार आहे. 

ड्रोनच्या प्रात्यक्षिकासाठी ड्रोन भाड्याने घेणाऱ्या संबंधित यंत्रणेला हेक्टरी ६ हजार रुपयांचे अनुदान, प्रात्यक्षिकासाठी ड्रोन खरेदी करणाऱ्या यंत्रणेला हेक्टरी ३००० रुपये देण्यात येणार आहेत. 

प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्या (PACS),एफपीओ आणि ग्रामीण उद्योजकांच्या यंत्रणांना ड्रोन खरेदीसाठी ४० टक्के अथवा ४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे (drone fereration of india)अध्यक्ष स्मित शहा यांनी दिली आहे. 

जे कृषी पदवीधर यासाठी पुढाकार घेणार आहेत त्यांना ड्रोन खरेदीसाठी ५० टक्के अथवा ५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ड्रोन खरेदीचे प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदानविषयक कार्यकारी समितीकडे पाठवले जाणार आहेत. 

कृषी क्षेत्रासाठी (agriculture) अपेक्षित सुविधा असणारे एक अत्याधुनिक असे ड्रोन साधारणतः ८ ते १० लाख रुपयांना मिळते.  केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अनुदान योजनेमुळे कृषी संशोधन आणि कृषी प्रशिक्षण केंद्रांना हा ड्रोन मोफत उपलब्ध होणार आहे. 

या संस्था देशभरातील शेतकऱ्यांमध्ये शेतीसाठी ड्रोनचा वापर करण्याबाबतचे प्रात्यक्षिक आणि महत्व पटवून देऊ शकतात. प्राथमिक सहकारी कृषी सोसायट्या (PACS), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), कृषी पदवीधरांनी स्थापन केलेल्या केंद्रांना अनुदानित ड्रोन मिळताहेत हे लक्षात आल्यावर कृषी क्षेत्रासाठीच्या ड्रोन निर्मितीत वाढ होईल.

ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळते आहे हे लक्षात घेत सर्वसामान्य शेतकरीही शेतीसाठी ड्रोनच्या वापराकडे परावृत्त होतील,  असा आशावाद शहा यांनी व्यक्त केला आहे.    

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.