शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याचे काम

सरकारकडून 'इंडिया डिजिटल इकोसिस्टम ऑफ ॲग्रीकल्चर' (IDEA) या नावाने हा डाटाबेस तयार करण्यात येत असून देशभरातील शेती व शेतकऱ्यांची अशी माहिती संकलित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.
farmers
farmers
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून (Union ministry of agriculture and farmers welfare)  केंद्र सरकारच्या विविध कृषी सेवा व योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांच्या माहितीचा समावेश असलेला एक डेटाबेस तयार करण्यात येत आहे.
 
हेही वाचा - दुप्पट शेतकरी उत्पन्नाचं काय झालं ? सरकारकडून  'इंडिया डिजिटल इकोसिस्टम ऑफ ॲग्रीकल्चर' (IDEA) या नावाने हा डाटाबेस तयार करण्यात येत असून देशभरातील शेती व शेतकऱ्यांची अशी माहिती संकलित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नुकतीच संसदेत दिली आहे.
या डेटाबेसच्या आधारे सरकारला शेती व शेतकरी कल्याणाच्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उतपन्नात वाढ करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनासाठीही या डेटाबेसचा उपयोग होणार आहे. त्यामुळेच या माहितीत असंघटित शेतकऱ्यांची माहिती अंतर्भूत करण्यात येत असून केंद्र सरकारच्या विविध कृषी सेवा (Agricultural goods) व योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहचवणे आता शक्य होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा असा डाटाबेस तयार करताना अल्पभूधारक, छोटा शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाईल, याची काळजी घेतली जात आहे. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, विविध विभागाकडील उपलब्ध माहितीच्या आधारे शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत असून ही माहिती जमिनीच्या डिजिटल नोंदींशी लिंक करण्यात येत असल्याचेही केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.  
व्हिडीओ पाहा -

संकलित करण्यात आलेल्या माहितीची सुरक्षितता, गोपनीयता लक्षात घेऊन सरकारकडून विचारपूर्वक असा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षिततेवरही काम कारले जाणार आहे. अशी माहिती देण्यासाठी आतापर्यंत तरी शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आलेली नाही. पंतप्रधान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश या डाटाबेसमध्ये करण्यात येत असल्याचेही तोमर यांनी नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com