इथेनॉलच्या दरात दुजाभाव नको

साखरेपासून इथेनॉल (sugarcane based ethanol manufacturers) निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाप्रमाणेच सर्व प्रकारच्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्यानांही (grain based ethanol manufacturers)स्वतंत्र दर आणि यासाठी मक्याचा वापर करणाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी या क्षेत्राकडून करण्यात आली आहे.
 इथेनॉलच्या दरात दुजाभाव नको
ethanol-corn

धान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे मका आणि तांदळापासूनच्या उत्पादनाला स्वतंत्र किंमत देण्याची मागणी केली आहे. 

साखरेपासून इथेनॉल (sugarcane based ethanol manufacturers) निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाप्रमाणेच सर्व प्रकारच्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्यानांही (grain baesed ethanol manufacturers) स्वतंत्र दर आणि यासाठी मक्याचा वापर करणाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी या क्षेत्राकडून करण्यात आली आहे.

मक्यापासून (maize) इथेनॉलनिर्मितीतील रिकव्हरी रेट प्रति टन ३८५ लिटर असा आहे. तांदळापासून (paddy) इथेनॉल निर्मितीचा रिकव्हरी रेट प्रति टन ४४० लिटर आहे. तेल विपणन कंपन्या (oil marketing companies)धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पास ५२.९० रुपये प्रति लिटर असा दर देत आहेत. याउलट या कंपन्या साखरेपासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना तीन प्रकारचे दर येऊन खरेदी करतात, असे एका प्रकल्पचालकाने म्हटले आहे. सरकारने मक्यापासून (maize) इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांनाही प्रति लिटर ५५ रुपये दर द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.       

व्हिडीओ पहा 

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात सरकारने उसाच्या रसापासून/ साखरेपासून/ साखरेच्या सिरपपासून तयार केलेल्या इथेनॉलला प्रति लिटर ६३.४५ रुपये दर जाहीर केला आहे. तर ब दर्जाच्या मळीपासून तयार इथेनॉलला प्रति लिटर५९.०८ रुपयांचा आणि क दर्जाच्या मळीपासून तयार इथेनॉलला प्रति लिटर ४६.६६ रुपये दर जाहीर केला आहे. जीएसटी आणि वाहतुकीचा खर्चही इथेनॉल पुरवठादारांकडे सोपवला आहे.     

जानेवारी २०२१ पासून केंद्रीय अन्न मंत्रालयाने मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीस संमती दिली असून या १९६ प्रकल्पामधून वर्षाकाठी ८५९.११ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची अपेक्षा आहे.  

याखेरीज सरकारने या धान्यापासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलचे दर ठरवण्याचे अधिकारही तेल विपणन कंपन्यांना बहाल केले आहेत. हरियाणा येथील पानिपत, पंजाबमधील भटिंडा ओडिशामधील बरगाह आसाममधील नुमलिगड आणि कर्नाटकातील देवणगेरे आदी ठिकाणी रिफायनरीज उभारण्यात आल्या आहेत.  

गेल्या आर्थिक वर्षात तांदळापासून इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (FCI) ४९,२३३ टन तांदूळ खरेदी केला होता. त्यापासून उत्पादकांनी २.१७ कोटी लिटर इथेनॉल तयार केले.  २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात उत्पादकांनी संमत निर्धारित ४,५८,८१७ टनांपैकी सध्या ११००० टन तांदूळ खरेदी केला आहे. 

३० डिसेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी व्याज सवलत योजना लागू केली होती. यात संबंधित उत्पादकांना  आहे त्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी नाममात्र दराने कर्जपुरवठा करण्यात आला. ५ वर्षांच्या परतफेडीच्या बोलीवर संबंधित उत्पादकांना ६ ते ५० टक्क्यापर्यंत कर्ज देण्यात आले. मात्र या सुविधेचा लाभ खूप कमी उत्पादकांना घेता आला.     

आपले ७५ टक्के इथेनॉलची उत्पादक तेल विपणन कंपन्यांना इथेनॉल मिश्रणासाठी देण्याची तयारी असलेल्या उत्पादकांनाच या   लाभ घेता आला होता. आजमितीस इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ४ टक्क्यांवर गेले असून २०२४-२०२५ पर्यंत ते प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com