अतिरिक्त चना खरेदीची गुजरातची केंद्र सरकारकडे विनंती

देशातील प्रमुख चना उत्पादक राज्य अशी ओळख असलेल्या गुजरातमध्ये यंदा बंपर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरातमधील वाढीव उत्पादन खरेदी करण्याची विनंती गुजरातकडून केंद्र सरकारला करण्यात येणार आहे.
Gram
Gram

देशातील प्रमुख चना उत्पादक राज्य अशी ओळख असलेल्या गुजरातमध्ये यंदा बंपर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरातमधील वाढीव खरेदी करण्याची विनंती गुजरातकडून केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.२३ ) गुजरात सरकारने याची माहिती दिली आहे. चालू हंगामात राज्यातील अतिरिक्त चन्याच्या (Additional Gram Procurement) खरेदीसाठी केंद्राशी संपर्क साधण्याचा निर्णय गुजरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Gujarat Cabinet Meeting) मंगळवारी घेण्यात आला.  

हेही वाचा - राज्यात खाद्यतेल, तेलबियांवर साठा मर्यादा राज्य सरकारने कापूस, मोहरी, (Mustard) एरंड, चना (Gram) आणि इतर डाळींची (Pulses) किमान आधारभूत किमतीने (MSP) खरेदी प्रक्रिया आधिच सुरू केल्याची माहिती मंत्री जितू वाघानी (Jitu Waghani) यांनी दिली. चण्याच्या वाढीव उत्पादनाला हमीभाव मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये;  त्यासाठी गुजरात सरकार आवश्यक टी पावले उचलत असल्याचे वाघानी म्हणाले आहेत. गुजरातमधील चण्याच्या वाढीव उत्पादनाची हमीभावाने खरेदी करण्यात यावी, असा प्रस्ताव गुजरात सरकारतर्फे केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. त्यासाठीचा आवश्यक पाठपुरावाही करण्यात येणार असल्याचे वाघांनी यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा - ऐन खरिपात बिहारमध्ये युरियाचा काळाबाजार  २०२१-२२ साठीच्या राज्य सरकारच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, २०२२ रब्बी हंगामात २४.९० लाख टन चना उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २०२०-२१ मध्ये १४.३७ लाख टन होते, जे त्या वर्षासाठी अंतिम आगाऊ अंदाज दर्शविते. डाळींच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्यामुळे चना उत्पादनात वाढ झाली आहे. मागील हंगामातील ८.१६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा चन्याचे लागवड क्षेत्र ११.३२ लाख हेक्टरवर गेले होते. राज्य सरकारच्या अंदाजनुसार, चन्याचे २.४९ टन प्रति हेक्टरी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या तुलनेत मागील हंगामात उत्पादन १.७६१ टन होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com