कृषी कायद्यांविरोधात कर्नाटक विधानसभेवर मोर्चा

कृषी कायदे कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या हितांसाठी असल्याचे राज्य सरकारकडून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेसमोर आंदोलन केले.
Hasiru sena and Karnataka rayat sangh march against farm laws
Hasiru sena and Karnataka rayat sangh march against farm laws
राज्य सरकारने तीन कृषी कायदे रद्द (Repealing of farm laws) करावेत, या  मागणीसाठी सोमवारी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेतर्फे विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा - शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याचे काम

दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चाच्या (Sanyukta kisan morcha) बॅनरखाली करण्यात आलेल्या किसान आंदोलनासमोर (Farmers protest) झुकते घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने संसदेत या विधेयकाचा प्रस्ताव सादर करत हा निर्णय प्रत्यक्षात आणला. मात्र भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारने अद्याप हे तीन कृषी कायदे रद्द केलेले नाहीत. कर्नाटक राज्य रयत संघासह अनेक शेतकरी संघटनांनी हे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.   

हेही वाचा -२०२४ पर्यंत डिझेलमुक्त शेती; केंद्र सरकारचं उद्दिष्ट 

हे कृषी कायदे कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या हितांसाठी असल्याचे राज्य सरकारकडून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेसमोर आंदोलन केले. यावेळी हे तीन कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत, अशा जोरदार घोषणाही दिल्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीन कृषी कायदे रद्द करणारा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती, मात्र अद्यापही राज्य सरकारने तसा प्रस्ताव विधानसभेत सादर केलेला नाही, अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष कोदीहळ्ळी चंद्रशेखर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.  

व्हिडीओ पाहा - संगोल्ली रेल्वे स्थानकापासून कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक मोर्चा काढला. हा मोर्चा विधानसभेजवळ पोचल्यानंतर विसर्जित करण्यात आला. विधानसभा परिसराभोवतीच्या २ किलोमीटरपर्यंतचा परिसर पोलिसांनी सील केल्यामुळे पोलिसांकडे निवेदन सोपवून हा मोर्चाचे विसर्जित करण्यात आला.    

 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com